Join us
Daily Top 2Weekly Top 5

साया फेम मानसी जोशी रॉय सांगतेय मी इतकी वर्षं कॅमेऱ्यासमोर नव्हे तर कॅमेऱ्याच्या मागे होती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2017 17:45 IST

साया या मालिकेतील सुधा आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. या मालिकेत सुधा ही भूमिका मानसी जोशी रॉयने साकारली होती. त्यानंतर ...

साया या मालिकेतील सुधा आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. या मालिकेत सुधा ही भूमिका मानसी जोशी रॉयने साकारली होती. त्यानंतर ती घरवाली उपरवाली, कुसूम यांसारख्या मालिकांमध्ये झळकली होती. गेल्या अनेक वर्षांपासून ती छोट्या पडद्यापासून दूर आहे. पण आता ढाई किलो प्रेम या मालिकेद्वारे ती छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. तिच्या या कमबॅकबाबत तिच्याशी मारलेल्या गप्पा...मानसी एक यशस्वी अभिनेत्री असताना तू छोट्या पडद्यापासून इतकी वर्षं दूर का राहिलीस?मी माझ्या कारकिर्दीत अनेक वेळा ब्रेक घेतले आणि ब्रेक घेण्यामागे नेहमीच वेगवेगळी कारणे होती. मी साया, घरवाली उपरवाली यांसारख्या मालिकांमध्ये माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीला काम केले होते. त्यानंतर लग्न झाल्यानंतर मी काही वर्षांचा ब्रेक घेतला. माझी मुलगी लहान असल्याने मी अभिनयापासून दूर राहाणे पसंत केले होते. नंतर माझी मुलगी तीन वर्षांची असताना मी कुसूम ही मालिका केली. या मालिकेतील माझ्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. ही मालिका संपल्यावर लगेचच मी रोहितसोबत नच बलियेमध्ये झळकली. पण त्यानंतर मी आमच्या प्रोडक्शन हाऊसकडे लक्ष देत होते. मी कॅमेऱ्याच्यासमोर नव्हे तर कॅमेऱ्याच्यामागे अनेक वर्षं काम करत आहे. कॅमेऱ्याच्या मागे काम करत असताना मला एक समाधान मिळत होते. त्यामुळे मी कधी अभिनयाचा विचार केला नाही. पण मी पुन्हा अभिनय केला पाहिजे असे रोहितचे मत असल्याने तो मला यासाठी नेहमीच प्रोत्साहन देत असे.इतक्या वर्षांनंतर तू अभिनयाकडे परतण्याचे कसे ठरवले? मी खरे तर अभिनयात परत येऊ की नाही याबाबत चांगलीच साशंक होते. पण मी पुन्हा अभिनयाकडे वळली पाहिजे असे नेहमीच रोहितचे म्हणणे होते आणि त्यात संदीप सिकंद ढाई किलो प्रेम या कार्यक्रमाचा भाग होते. त्यामुळे मी मालिकेत काम करण्याचे ठरवले.ढाई किलो प्रेम या मालिकेत तुझी भूमिका काय असणार आहे?ढाई किलो प्रेम या मालिकेत अतिशय साध्या महिलेची मी भूमिका साकारत आहे. आपल्या मुलांवर अतिशय प्रेम करणारी ही स्त्री असून ही एक अतिशय सशक्त व्यक्तिरेखा आहे.तुमचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस आहे आणि त्यात तू रोहित रॉय, रोनित रॉय, शर्मन जोशी असे अनेक प्रसिद्ध कलाकार तुमच्या कुटुंबात आहेत. त्यामुळे या सगळ्यांना एकत्र आणून काही प्रोजेक्ट करण्याचा विचार आहे का?मला आणि रोहितला तर अनेक वर्षांपासून एकत्र काम करायचे आहे. एका प्रोजेक्टबद्दल आम्ही विचारदेखील केला होता. पण काही कारणास्तव तो प्रोजेक्ट होऊ शकला नाही. पण भविष्यात त्याच्यासोबत काम करण्याचा माझा विचार आहे. तसेच आमच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये आमच्या घरातील प्रसिद्ध कलाकार प्रेक्षकांना यापुढे तरी पाहायला मिळतील याची नक्कीच आशा करूया.तू आणि रोहित दोघेही अभिनयक्षेत्रातील आहात, तुमच्या मुलीला या क्षेत्राबाबत आवड आहे का?आमची मुलगी आता चौदा वर्षांची झाली आहे. बॅले, पेंटिंग या गोष्टीत तिला प्रचंड रस आहे. तिला क्रिएटिव्ह गोष्टी करायला फार आवडतात. पण अद्याप तरी तिला अभिनयाची आवड नाहीये.एकाच क्षेत्रातील व्यक्तीशी लग्न करणे फायदेशीर असते असे तुला वाटते का?मी आणि रोहित दोघेही एकाच क्षेत्रातून असल्याने आमच्या दोघांचे काम काय असते? आम्हाला कामात कोणकोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो? काम करताना कितपत प्रेशर असते? हे सगळे आम्हाला एकमेकांना माहीत आहे. त्यामुळे आम्ही एकमेकांना खूप चांगल्याप्रकारे समजून घेऊ शकतो. त्यामुळे एकाच क्षेत्रातील व्यक्तीशी लग्न करणे हे नेहमीच फायदेशीर आहे असे मला वाटते.