Join us
Daily Top 2Weekly Top 5

रुहाना परतणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2016 12:50 IST

गंगा या मालिकेतील गंगाची भूमिका साकारणारी रुहाना खन्ना ही चिमुरडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या मालिकेने लीप घेतल्यानंतर रुहानाने ...

गंगा या मालिकेतील गंगाची भूमिका साकारणारी रुहाना खन्ना ही चिमुरडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या मालिकेने लीप घेतल्यानंतर रुहानाने मालिका सोडली. पण आता रुहाना मालिकेत परतणार आहे. गंगाची मुलगी कृष्णाची भूमिका रुहाना साकारणार असल्याचे म्हटले जाते. सप्टेंबरमध्ये ही मालिका पुन्हा लीप घेणार असून ऑगस्टमध्ये रुहाना चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. रुहानाला गंगा या मालिकेने प्रचंड लोकप्रियता मिळवून दिल्यामुळे या या मालिकेत परतण्यासाठी ती खूपच उत्सुक आहे.