Join us

दृष्टी महिमाच्या भूमिकेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2016 13:20 IST

परदेस या चित्रपटावर बेतलेली एक मालिका लवकरच सुरू होणार असल्याची चर्चा आहे. या मालिकेची निर्मिती एकता कपूर करणार आहे. ...

परदेस या चित्रपटावर बेतलेली एक मालिका लवकरच सुरू होणार असल्याची चर्चा आहे. या मालिकेची निर्मिती एकता कपूर करणार आहे. या मालिकेत शालीन मल्होत्रा प्रमुख भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. या मालिकेसाठी दृष्टी धामीला विचारण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे. परदेस या चित्रपटात महिमा चौधरीने साकारलेल्या भूमिकेप्रमाणेच दृष्टीची या मालिकेतली भूमिका असणार आहे. पण अशाप्रकारची भूमिका ऑफरच करण्यात आलेली नाहीये असे दृष्टीचे म्हणणे आहे. दृष्टी या मालिकेत झळकते की नाही हे काही दिवसांतच कळेल.