Join us

रोनित पाहुण्या कलाकाच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2016 16:31 IST

रोनित रॉय हे आज छोट्या पडद्यावरचे एक मोठे नाव समजले जाते. सध्या अदालत या मालिकेत रोनित काम करत आहे. ...

रोनित रॉय हे आज छोट्या पडद्यावरचे एक मोठे नाव समजले जाते. सध्या अदालत या मालिकेत रोनित काम करत आहे. रोनित २४ या मालिकेत पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार आहे. २४ या मालिकेच्या दुसऱ्या सिझनमध्ये अभिनेता अनिल कपूर, शबाना आझमी, आशिष विद्यार्थी, साक्षी तन्वर यांसारखे कलाकार झळकणार आहेत. यांच्यासोबतच या मालिकेत अनेक कलाकार पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणार असल्याची चर्चा कित्येक दिवसांपासून सुरू आहे. या मालिकेसाठी नुकतेच रोनितने चित्रीकरण केले असून त्याची भूमिका छोटी असली तरी महत्त्वाची असल्याचे म्हटले जात आहे. चित्रीकरणानंतरचा फोटो रोनितने इन्स्टाग्रामवर टाकला असून शबाना आझमी आणि अनिल कपूर यांच्यासोबत चित्रीकरण करण्याचा अनुभव खूप चांगला असल्याचे तो सांगतो.