Join us

​रोहित शेट्टीला बॉलिवूडमधील या सुपरस्टारसोबत करायचे आहे काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2018 16:24 IST

ॲक्शन आणि कॉमेडी किंग दिग्दर्शक रोहित शेट्टी हा आपल्या चित्रपटांमधून प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन करत असतो. त्याने आजवर अजय देवगण, ...

ॲक्शन आणि कॉमेडी किंग दिग्दर्शक रोहित शेट्टी हा आपल्या चित्रपटांमधून प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन करत असतो. त्याने आजवर अजय देवगण, शाहरूख खान, काजोल यांच्यासोबत काम केले आहे. बॉलिवूडमधील या सुपरस्टार्स सोबत काम केल्यानंतर त्याने इंडियाज्‌ नेक्स्ट सुपरस्टार्स या रिॲलिटी शो च्या मंचावर आणखी एका सुपरस्टार सोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. रोहितला बॉलिवूडचा सुपरस्टार गोविंदासोबत काम करायचे आहे आणि त्याने कार्यक्रमात तसे सांगितले देखील आहे. रोहित शेट्टीने आजवर गोलमाल, गोलमाल रिटर्न्स, गोलमाल अगेन, चेन्नई एक्सप्रेस यांसारखे हिट कॉमेडी चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. इंडियाज्‌ नेक्स्ट सुपरस्टार्स या शोमधील कॉमेडी ॲक्टचे परीक्षण करताना त्यांनी मास्टर ऑफ कॉमेडी गोविंदासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तो सांगतो, “एका अभिनेत्यासाठी कॉमेडी करणे सर्वांत कठीण आहे. तुम्ही कॉमेडी चित्रपटात काम करत असताना एक तर प्रेक्षकांना हसवता किंवा एक अभिनेता म्हणून तुमच्या अस्तित्वाबद्दल प्रश्न निर्माण करता. मला कॉमेडी किंग गोविंदासोबत काम करण्याची इच्छा आहे ”इंडियाज्‌ नेक्स्ट सुपरस्टार्स या कार्यक्रमात एकाहून एक चांगले स्पर्धक आहेत. या कार्यक्रमातील श्रुती शर्माच्या परफॉर्मन्सचे कौतुक करताना तो सांगतो, “जुही चावला, काजोल, दीपिका पादुकोण आणि अर्थातच मास्टर ऑफ कॉमेडी गोविंदासारखी कॉमेडी खूपच कमी लोक करू शकतात. गोविंदा दृश्याला एका वेगळ्‌या उंचीवर घेऊन जातो. मला तुझा हा ॲक्ट खूप आवडला.”स्टार प्लसवरील शो इंडियाज्‌ नेक्स्ट सुपरस्टार्सने आपल्या ताज्या नवीन कॉन्टेन्टसह प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे आणि आता स्पर्धक आपल्या प्रदर्शनाला पुढच्या स्तरावर घेऊन जाण्यासाठी दररोज सुपरस्टार्स की पाठशाला या ॲकॅडमीमध्ये मेहनत घेत आहेत. या शोमधील स्पर्धकांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना प्रभावित केले आहे. पण अव्वल दिग्दर्शक रोहित शेट्टीने त्यांना त्यांच्या संवादफेकीवर काम करण्यास सांगितले. या गोलमाल दिग्दर्शकाने स्पर्धकांना त्यांच्या डिक्शनवर काम करायला सांगितले आणि आपले संवाद व आवाजावर प्रभुत्व मिळवण्यासाठी दररोज करण्यासारखे काही व्यायाम सांगितले. रोहितने हेही नमूद केले की, त्याने अजय देवगण आणि हृतिक रोशन यांना या एक्सरसाईज, योगा वगैरे डिक्शन आणि डायलॉग डिलिव्हरीसाठी करताना पाहिले आहे. अर्थातच, स्पर्धकांनी लगेचच त्यांच्या या सूचनेवर अंमल केला.Also Read : ​इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार्सच्या मंचावर सोनू के टिटू की स्वीटीच्या टीमने लावली हजेरी