Join us
Daily Top 2Weekly Top 5

रिया पडली आजारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2016 13:48 IST

कहानी हमारी या मालिकेत गौरीची भूमिका साकारणारी रिया शर्मा गेल्या काही दिवसांपासून मालिकेचे चित्रीकरण करत नाहीये. रियाला कांजण्या झाल्या ...

कहानी हमारी या मालिकेत गौरीची भूमिका साकारणारी रिया शर्मा गेल्या काही दिवसांपासून मालिकेचे चित्रीकरण करत नाहीये. रियाला कांजण्या झाल्या असून डॉक्टरांनी तिला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे आणखी काही दिवस तरी ती चित्रीकरण करणार नाही. या मालिकेत रिया प्रमुख भूमिका साकारत असल्याने मालिकेच्या पटकथेतही काही बदल करण्यात येणार आहेत. रियाची तब्येत सुधारत असून पुढील काही दिवसांत ती पुन्हा चित्रीकरणाला सुरुवात करणार असल्याचे ती सांगते.