Join us
Daily Top 2Weekly Top 5

​चाहूल या मालिकेत होणार रेश्मा शिंदेची एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2017 15:55 IST

चाहूल या मालिकेच्या कथानकाला नुकतीच कलाटणी मिळाली आहे. सर्जेराव आणि जेनीच्या लग्नाची सगळ्यांना उत्सुकता लागली होती. त्यांच्या लग्नाची जय्यात ...

चाहूल या मालिकेच्या कथानकाला नुकतीच कलाटणी मिळाली आहे. सर्जेराव आणि जेनीच्या लग्नाची सगळ्यांना उत्सुकता लागली होती. त्यांच्या लग्नाची जय्यात तयारीदेखील सुरू होती. पण लग्नाच्या दिवशीच अचानक जेनीचा मृत्यू झाला. जेनीच्या मृत्युमागे कोणाचा हात आहे? निर्मलाच हे सगळे करत आहे का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे सध्या प्रेक्षकांना पडलेली आहेत. जेनीच्या आकस्मिक मृत्यमुळे वाड्यातील सगळ्यांनाच चांगलाच धक्का बसला आहे. पण या सगळ्यात आता एक नवी एंट्री होणार आहे. प्रेक्षकांना या मालिकेत आता शांभवीला पाहायला मिळणार आहे. शांभवी ही कोण आहे तिच्या येण्याने वाड्यातील लोकांच्या आयुष्यावर काय परिणाम होणार आहे याची उत्तरे प्रेक्षकांना काहीच दिवसांत मिळणार आहेत. शांभवी ही भूमिका रेश्मा शिंदे साकारणार आहे. रेश्माने लगोरी, नांदा सौख्यभरे यांसारख्या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.शांभवी ही अतिशय मनमिळाऊ आणि निरागस मुलगी असल्याचे दाखवले जाणार आहे. ती महादेव यांच्या मदतीने वाड्यात येणार आहे. शांभवीला तिच्या लहानपणापासून एक दैवी शक्ती लाभली आहे. अमानवी शक्ती, आत्मा, अघटित गोष्टींची तिला खूप आधीच चाहूल लागते. त्यामुळे वाड्यातील रहस्य उलगडण्यासाठीच ती वाड्यात आली आहे. तिच्या एंट्रीनंतर वाड्यातील अनेक रहस्य उलगडणार आहेत. शांभवीची एंट्री झाल्यानंतर तिची आणि सर्जेरावांची मैत्री होते का आणि या मैत्रीचे प्रेमात रूपांतर होते का हेदेखील पाहाणे इंटरेस्टिंग ठरणार आहे. जेनीच्या मृत्यूचे रहस्य आणि निर्मलाच्या आत्म्याचे गूढ उघडकीस आणण्यास निर्मलाची साथ शांभवीला लाभणार की यात निर्मला अडथळे निर्माण करणार हे पाहणे नक्कीच रंजक असणार आहे.