Join us
Daily Top 2Weekly Top 5

रिध्दिमा तिवारी पडली स्वत:च्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2017 17:01 IST

‘गुलाम’ या मालिकेत रिध्दिमा तिवारी ‘माल्दावाली’ ही एका मादक स्त्रीची व्यक्तिरेखा साकारीत आहे. तिने या भूमिकेद्वारे प्रेक्षकांचे लक्ष स्वत:कडे ...

‘गुलाम’ या मालिकेत रिध्दिमा तिवारी ‘माल्दावाली’ ही एका मादक स्त्रीची व्यक्तिरेखा साकारीत आहे. तिने या भूमिकेद्वारे प्रेक्षकांचे लक्ष स्वत:कडे वेधले असून या मालिकेतील ती एक सर्वाधिक लोकप्रिय व्यक्तिरेखा आहे. या मालिकेतील रिध्दिमाची काही मादक छायाचित्रे अलीकडेच इंटरनेटवरही झळकली असली,तरी रिध्दिमा त्यामुळे विचलित झाली नव्हती.किंबहुना छोट्य़ा पडद्यावरील नवी मादक ललना अशा आपल्या प्रतिमेबाबत ती काहीशी उत्साही बनली आहे.“लोकांना तुम्ही सेक्सी वाटता, ही भावना मला फारच मजेशीर आणि एक मानसिक समाधान देणारी वाटते.मी बुरसटलेल्या विचारांची नसून मला कोणी सेक्सी म्हटलं, तर तो मला माझा गौरव वाटतो,” असे रिध्दिमाने सांगितले. तिच्या मते तिला सेक्सी म्हणणे हे स्वाभाविक असून सर्वच तरुण मुलीसुध्दा या व्याख्येत बसू शकत नाहीत. म्हणूनच तिला तिच्या या नव्या ओळखीबद्दल अपराधी वाटत नाही. “ही एक उत्तम भूमिका असून तिला सेक्सी प्रतिमेचं वलय लाभलं, तर त्यामुळे माझी प्रतिमा फारच उजळून जाईल,” असे सांगून ती म्हणाली की त्यामुळे या मालिकेला अधिक प्रेक्षक लाभतील.सध्या आपण ‘गुलाम’ मालिकेत माल्दावालीची भूमिका करण्याबाबत समाधानी आहोत, असे ती म्हणाली.“एखाद्या मालिकेत प्रथमच मला इतक्या चांगल्या प्रकारे सादर करण्यात आले आहे.माल्दावालीची भूमिका मी मादक पध्दतीने रंगविणार आहे, स्वस्त नव्हे.मालिकेतील मी फारच आकर्षक दिसते,” असे रिध्दिमा म्हणाली.रिध्दिमा तिवारी लवकरच बेगम जान या चित्रपटात विद्या बालनबरोबर भूमिका रंगविताना दिसेल.