Join us
Daily Top 2Weekly Top 5

साउथ च्या डान्स रियालिटी शोमध्ये रिचा अंतिम फेरीत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2016 11:12 IST

 सध्या रियालिटी शो प्रेक्षकांमध्ये हिट होताना दिसत असल्याचे पाहायला मिळत आहेत. कारण नेहमीच्या सासू सूनांच्या भांडणापेक्षा रियालिटी शो पाहणे ...

 सध्या रियालिटी शो प्रेक्षकांमध्ये हिट होताना दिसत असल्याचे पाहायला मिळत आहेत. कारण नेहमीच्या सासू सूनांच्या भांडणापेक्षा रियालिटी शो पाहणे प्रेक्षकांना जास्त आवडायला लागले आहेत. आता हेच पाहा ना, महाराष्ट्राप्रमाणेच इतर राज्यातदेखील रियालिटी शो मोठया प्रमाणात पाहायले जातात. म्हणून इतर कलाकारांप्रमाणेच आता, महाराष्ट्रीयन रियालिटी शोचे स्पर्धक साउथ डान्स रियालिटी शोमध्येदेखील पाहायला मिळत आहेत. एवढेच नाही तर हे स्पर्धक अंतिम फेरीतदेखील पोहोचले आहेत. महाराष्ट्राची लाडकी रिचा अग्निहोत्री ही   साउथ च्या डान्स रियालिटी शोमध्ये रिचा अंतिम फेरीत पोहोचली आहे. या रियालिटी शोचे नाव किक असे आहे. साउथमध्ये हा हिट रियालिटी शो असल्याचे पाहायला मिळत आहे. रिचा यापूर्वी ढोलकीच्या तालावर हा मराठी डान्स रियालिटी शो गाजवल्यानंतर रिचा साउथला जाऊन धडकली आहे. या रियालिटी शोमध्ये ती आणि तिचा डान्स पार्टनर कौशिक सुवर्णा यांनी तपन गुची, बि-बोयिंग, हिप हॉप,कथ्थक,लावणी,फ्री स्टाईल,अशा विविध डान्स फॉर्म चा वापर करत परीक्षकांना आणि प्रेक्षकांना प्रभावित केलं आहे. नवीन डान्स पार्टनर,कन्नडा भाषेची फारशी जाण नसतांना आणि नवीन कोरिओग्राफर असूनही तिनं सादर केलेल्या नृत्यांना  जबरदस्त दाद मिळाली. साउथचे नावाजलेले अभिनेते आणि या शो चे  परीक्षक शिवराजकुमार, रचिता राम,आणि हर्षा मास्टर यांनी ,तिच्या नृत्याची आणि एक्सप्रेशन्सची तुलना माधुरी दीक्षित बरोबरही केली. तपनगुची या साउथ इंडीयन डान्सच्या राउंड मध्ये हेवी बिट्स वर डान्स करत कॉमेडी परफॉरमन्स ही तिने केला आणि त्या आठवड्यात परफॉर्मन्स आॅफ द विक हा किताब पटकावला. प्रॉपर्टी राउंड मध्ये फक्त एका कापडाच्या तुकड्याचा वापर करत एका कन्नडा सॉंग वर परफॉर्म करून त्या आठवड्यात पूर्ण मार्क्स मिळवत हार्ट आणि कँप हे मानाचं गिफ्ट मिळवलं. या नृत्याच्या अनोख्या प्रवासात जुरीज कडून मिळणारा फायर ब्लास्ट तीनं सात वेळा पटकावला. साउथ च्या नृत्य विश्वात स्वत: चं वेगळं स्थान निर्माण करणाºया मराठी मुंबईकर रिचाचे विशेष कौतुक होत आहे.