Join us

प्रत्युषाच्या मृत्युला तिचे घरचे जबाबदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2016 22:50 IST

बालिका वधू फेम अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीने गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणावरुन तिचा मित्र राहुल सिंहला पोलिसांनी अटक  केली आहे. ...

बालिका वधू फेम अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीने गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणावरुन तिचा मित्र राहुल सिंहला पोलिसांनी अटक  केली आहे. प्रत्युषाच्या आत्महत्येवरून आता आरोप प्रत्यरोपांना सुरूवात झाली आहे. या प्रकरणावरून राहुलची आई डॉ. शिवानी सिंग यांनी प्रत्युषाच्या घरच्यांना टार्गेट केले असून तिच्या आत्महत्येस तिचेच कुटुंब जबाबदार असल्याचा आरोप शिवानी सिंगने केला आहे. कोट्यवधी रुपये कमविणारी प्रत्युषा नेहमी तणावामध्ये असायची. प्रत्युषाचं आणि तिच्या आईचं मुंबईच्या कांदिवलीतल्या आयसीआयसीआय बॅँकेमध्ये जॉर्इंट अकाऊंट होते. या अकाऊंडमधुन ४ कोटी रुपये तिच्या घरच्यांनी काढले, त्यामुळे प्रत्युषा तणावात होती, असा दावा राहुलच्या आईने केला आहे.