Join us
Daily Top 2Weekly Top 5

रेणुका शहाणे झाली हॅपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2016 09:30 IST

बॉॅलीवुडप्रमाणेच मराठी इंडस्ट्रीमध्ये देखील आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री रेणुका शहाणे ही अत्यंत हॅपी झाली आहे. कारण ...

बॉॅलीवुडप्रमाणेच मराठी इंडस्ट्रीमध्ये देखील आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री रेणुका शहाणे ही अत्यंत हॅपी झाली आहे. कारण ती खूष होण्याचे कारण ही एकदम वेगळे आहे. यावेळी या अभिनेत्रीला कोणता पुरस्कार मिळाला नाही किवा कोणता चित्रपट ही येत नाही तर ही अभिनेत्री आनंदी झाली ती लातूरकरांना पाणी मिळाले म्हणून. याबाबत लोकमत सीएनएक्सशी बोलताना रेणुका शहाणे म्हणाली, खरंच मुख्यमंत्री देवेंन्द फडणवीस व रेल्वे मंत्री  सुरेश प्रभु यांच्या या कल्पनेला मी दाद देते. आज या दुष्काळ परिस्थितीत रेल्वेने पाणी पुरविण्याची ही त्यांची मोहिम खरंच कौतुकास्पद आहे.तसेच भारत जर दुष्काळ मुक्त करायचा असेल तर प्रत्येक राज्याने, गावाने कोणाताही स्वार्थ न बाळगता पाणी पुरवठा शेअर करणे ही भावना बाळगली पाहिजे. त्याचबरोबर सर्वानी आपआपल्या परीने पाणी जपून वापरा असा संदेश देखील देऊ इच्छिते.