Join us
Daily Top 2Weekly Top 5

म्हणून रीना अगरवालने स्विकारली 'मन उडू उडू झालं' ही मालिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 16:47 IST

‘मन उडू उडू झालं’ ही रीनाची पहिली मराठी मालिका आहे.

'मन उडू उडू झालं' हि मालिका छोट्या पडद्यावर नुकतीच सुरु झाली आली.मालिका आता रंजक वळणावर आली आहे. मालिकेतील ट्विस्ट रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहेया मालिकेच्या प्रोमोजपासूनच मालिकेबद्दल प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता होती.या मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा रसिकांच्या मनात घर करण्यात यशस्वी ठरत आहे. या मालिकेत प्रेक्षकांचे आवडते कलाकार हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत या दोघांच्या भूमिकांना रसिकांची प्रचंड पसंती मिळत आहे.

अगदी पहिल्या भागापासूनच प्रेक्षकांनी या मालिकेला पसंती दर्शवली आहे. तसंच तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेली अभिनेत्री हृता दुर्गुळेच्या मालिकेतील लूकवर प्रेक्षक आणि चाहते अक्षरशः फिदा झाले आहेत. हृता प्रमाणे अभिनेत्री रीना अगरवालही रसिकांच्या तितकीच पसंतीस पात्र ठरत आहे. तिच्या भूमिकेनेही रसिकांची अल्पावधीतच पसंती मिळवली.  

'मन उडू उडू झालं' ही मालिका आणि त्यातील व्यक्तिरेखा प्रेक्षकांची मन जिंकत आहे. दिपू आणि इंद्राची जोडी तर गाजतेच आहे पण त्याचसोबत मालिकेतील इतर कलाकार देखील प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत आहेत.अशीच एक व्यक्तिरेखा म्हणजे दिपूची मोठी बहीण सानिका. सैनिकांची भूमिका अभिनेत्री रीना अगरवाल अगदी चोख बजावतेय.

‘मन उडू उडू झालं’ ही रीनाची पहिली मराठी मालिका आहे. याविषयी व्यक्त होताना रीना म्हणाली,‘मन उडू उडू झालं’ ही माझी पहिली मराठी मालिका त्यामुळे मला असं वाटतंय की, मी माझ्या मायेच्या, हक्काच्या घरी परत आली आहे आणि फक्त माझ्याच नव्हे तर मी जगभरातल्या सर्व मराठी प्रेक्षकांच्या घरी आली आहे ज्यांना मी आठवड्यातले सलग ६ दिवस भेटणार आहे आणि त्यांच्याच घरातला एक भाग बनणार आहे.

तसेच या मालिकेचे दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांच्याबद्दल खूप ऐकलं होतं, त्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्याची छान संधी या निमित्ताने मला मिळाली. हृतासोबत आणि इतर कलाकारांसोबत काम करताना मजा येतेय. सेटवरील वातावरण अगदी हलकं-फुलकं, प्रसन्न आहे असं वाटतंय जणू वर्क फ्रॉम होम च चालू आहे इतक्या छान पद्धतीने सेटवर सर्वांचा वावर असतो.”