Join us

म्हणून पीएम मोदी यांनी टीव्ही स्टार्सचे मानले आभार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 19:57 IST

यात कलाकारांचा वाटा हा मोठा आहे. सर्वच कलाकार एकजुट होत आपल्या कमाईचा काही भाग हा पंतप्रधान केअर फंडला देत आहेत.

कोरोना विषाणूबाधेमुळे जगभरात प्रचंड भीती आणि चिंतेचे वातावरण आहे. लॉकडाऊन व आयसोलेशनमध्ये राहिल्यामुळे लोकांना आपला व्यापार बंद पडेल, नोकरी जाईल आणि बेघर होण्याची प्रचंड भीती वाटत आहे. यादरम्यान अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेकांवर तर  रोजीरोटीचे संकट आणखीनच तीव्र झाले आहे. या कठीण काळात प्रत्येकाला आधार द्या, त्यांची मदत करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी लॉकडाऊन जाहीर करण्यादरम्यान केले होते. मोदी यांच्या आवाहनानंतर प्रत्येकजण जसे जमेल तसे या लढाईत उतरत साथ देत आहे. 

यात कलाकारांचा वाटा हा मोठा आहे. सर्वच कलाकार एकजुट होत आपल्या कमाईचा काही भाग हा पंतप्रधान केअर फंडला देत आहेत. कलाकारांनी देखील असाच एक उपक्रम हाती घेत गरजुंना मदत केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाव्हायरस विरोधातील लढाईचे समर्थन करण्यासाठी लाँच करण्यात आलेल्या 'फॅन का फॅन' या संकेतस्थळाचे आणि त्याच्याशी जुळलेल्या दिव्यांका त्रिपाठी, भारती सिंग, गौतम रोडे आणि रश्मी देसाई यासारख्या टीव्ही कलाकारांचे कौतुक केले आहे.पंतप्रधानांनी ट्विट करुन या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

त्यांनी लिहिले की, "कोरोनाव्हायरस विरूद्ध भारतील लढा मजबूत करण्यासाठी टीव्ही कलाकारांनी केलेला हा अभूतपूर्व प्रयत्न आहे. या मोहिमेमध्ये एकत्र आलेल्या सर्वांचे मी आभार मानतो." या संदेशासह पंतप्रधानांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये जेडी मजीठिया श्वेता नावाच्या महिलेचे आभार मानताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये जेडीने पीएम केअर फंडामध्ये हातभार लावल्याबद्दल या महिलेला सलाम केले आहे. 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस