Join us

​या कारणामुळे कसम तेरे प्यार की फेम अमित टंडनची पत्नी पोहोचली जेलमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2017 14:22 IST

अमित टंडनने त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात क्योंकी साँस भी कभी बहू थी या मालिकेद्वारे केली. खरे तर इंडियन आयडल या ...

अमित टंडनने त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात क्योंकी साँस भी कभी बहू थी या मालिकेद्वारे केली. खरे तर इंडियन आयडल या कार्यक्रमात तो झळकला होता. त्याच्या आवाजाचे सगळ्यांनी कौतुक देखील केले होते. पण त्याला क्योंकीमध्ये काम करायची संधी मिळाली आणि तो अभिनयक्षेत्राकडे वळला. अमितने दिल मिल गये, जिनी और जुजू यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. अमितने रूबी या डॉक्टरसोबत लग्न केले होते. त्यांच्या लग्नाला दहा वर्षं झाली असून त्यांना सात वर्षांची मुलगी देखील आहे. त्या दोघांची ओळख सोशल नेटवर्किंगद्वारे झाली होती. त्यावेळी अमित मुंबईत तर रुबी शिकागोमध्ये राहात होते. पहिल्याच भेटीनंतर काहीच दिवसांत त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. पण आता त्यांचा घटस्फोट झाला असून ते एकमेकांपासून वेगळे राहात आहेत. मात्र सध्या रुबी तुरुंगात असल्याचे कळतेय.अमित सध्या कसम तेरे प्यार की या त्याच्या मालिकेत व्यग्र आहे तर रुबी गेल्या कित्येक दिवसांपासून दुबईमध्ये राहात आहे. रुबी गेल्या अनेक दिवसांपासून दुबईच्या जेलमध्ये असून तिला जामिनदेखील मिळत नसल्याचे म्हटले जात आहे. दुबईतील अल राफा जेलमध्ये गेल्या एक महिन्यांपासून रूबी असून तिच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला होता. तिचा अर्ज फेटाळून लावण्यात आलाय. अमित काही दिवसांपूर्वी रूबीसाठी दुबईला देखील गेला होता. तिला जेलमधून बाहेर काढण्यासाठी तो अनेक प्रयत्न देखील करत आहे. पण त्याचे सगळेच प्रयत्न अयशस्वी ठरत आहेत. रुबीने दुबईमधील सरकारी अधिकाऱ्यांना धमकी दिल्याची केस तिच्यावर दाखल करण्यात आली आहे. रुबी ही प्रसिद्ध डर्मेटोलॉजिस्ट असून छोट्या पडद्यावरचे अनेक प्रसिद्ध कलाकार तिचे क्लाइंट आहेत. Also Read : अमितने रचला इतिहास