Join us
Daily Top 2Weekly Top 5

खऱ्या आयुष्यात हम तो तेरे आशिक है फेम माधवी नेमकर आहे फिटनेस फ्रिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2018 15:45 IST

फिट राहण्याबाबत सध्या सगळेच जागृक झाले आहेत असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. लढ्ढपणा असो वा नसो पण ...

फिट राहण्याबाबत सध्या सगळेच जागृक झाले आहेत असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. लढ्ढपणा असो वा नसो पण कायम फिट आणि हेल्थी राहणं गरजेचं आहे. या फिट राहण्याच्या फंड्यामध्ये सेलिब्रिटीही काही मागे नाहीत. फिटनेस म्हणजे कलाकारांचा वीक पॉइंट असतो हे आपणा सर्वांना माहिती आहे. झी मराठी वरील ‘हम तो तेरे आशिक है’ या लोकप्रिय मालिकेतील शालू वहिनी म्हणजेच अभिनेत्री माधवी नेमकरच्या बाबतीत देखील असंच काहीसं आहे.‘हम तो तेरे आशिक है’ या मालिकेत माधवी साकारत असलेल्या शालू वहिनी या भूमिकेची सध्या चांगलीच चर्चा आहे. माधवीच्या भूमिकेप्रमाणे तिच्या दिसण्याची देखील चांगलीच चर्चा आहे. माधवीच्या फिटनेसचे देखील चांगलेच कौतुक तिचे फॅन्स करतात. हम तो तेरे आशिक है या मालिकेत शालूला फिटनेसचे प्रचंड वेड आहे आणि त्यासाठी ती झुंबा डान्सच्या कार्यशाळा देखील घेते हे प्रेक्षकांनी पाहिलंच आहे. पण माधवी खऱ्या आयुष्यात देखील तितकीच फिटनेस फ्रिक आहे. फिट राहण्यासाठी माधवी नियमित योगा करते. माधवीच्या फिट राहण्यामध्ये योगविद्येचे मोलाचे योगदान असून ती तिच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर देखील तिच्या योगा पोझेस मधील फोटोज तिच्या चाहत्यांसाठी शेअर करते. तिचा हा फिटनेस फंडा शेअर करताना माधवी सांगते, "वयानुसार येणारे शारीरिक आजार, आजच्या धावपळीच्या युगात नोकरी, व्यवसाय, शिक्षण यामुळे निर्माण होणारे ताण-तणाव किंवा तत्सम समस्यांवर ‘फिटनेस’ हा एकच उपाय आहे. किंबहुना, निरोगी आणि सुंदर आयुष्यासाठी ‘फिटनेस’ हीच गुणवत्ता आहे. त्यामुळे ‘फिटनेस’ ही आपली 'जीवनशैली' झाली पाहिजे. 'फिट' तर 'हिट'... मी योगा गेली ४ वर्ष करतेय आणि हेल्दी डाएट गेली आठ वर्ष करतेय. योगविद्येचे अनेक फायदे आहेत. योगामुळे फक्त शरीर लवचिक होत नाही तर आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आपण जो स्ट्रेस अनुभवतो तो देखील योगामुळे कमी होतो तसेच योगामुळे मानसिक शांतीदेखील प्राप्त होते.”Also Read : हम तो तेरे आशिक है ही मालिका या हिंदी मालिकेचा रिमेक?