Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोणी मारली 'विकता का उत्तर' च्या अंतिम टप्प्यात मजल,जाणून घेण्यासाठी वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2016 16:33 IST

'विकता का उत्तर' कार्यक्रमाने महाराष्ट्रातील सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला सेलिब्रेटी बनवले. स्पर्धकांना या शोमध्ये एंट्री करत आपले नशीब आजमवले. आपल्या बौद्धिक ...

'विकता का उत्तर' कार्यक्रमाने महाराष्ट्रातील सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला सेलिब्रेटी बनवले. स्पर्धकांना या शोमध्ये एंट्री करत आपले नशीब आजमवले. आपल्या बौद्धिक क्षमतेच्या जोरावर पुण्याच्या सचिन शेलारची विशेष कामगिरी पाहायला मिळणार आहे.सुरुवातीपासूनच सचिनने उत्कृष्ट खेळी खेळत रसिकांना अचंबित केले होते. प्रत्येक प्रश्नांची अचूक उत्तर देणाऱ्या या सचिनचा खुद्द रितेश देशमुख देखही फॅन झाला आहे. या कार्यक्रमत उत्तम खेळी खेळणारे सचिन हे पहिलेच स्पर्धक आहेत जे 'विकता का उत्तर' च्या शोमध्ये अंतिम टप्प्यांपर्यंत मजल मारू शकले. 'विकता का उत्तर'च्या पिचवर त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर पैशांचा अक्षरश: पाऊस पाडला आहे. सचिन हे व्यवसायाने इंजिनीअर असून, बर्कलेस टेक्नॉलॉजी सेंटरमध्ये ते असिस्टंट वाईस प्रेसिडेंट पदावर काम करतात. 'विकता का उत्तर' या कार्यक्रमाच्या माध्यमातून सचिनवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या गेम शोमध्ये स्पर्धकाला भाव करणाऱ्या कलाकारांशी चुरस करावी लागते. या गेम शोचं वेगळेपण म्हणजे, यातील स्पर्धकाबरोबरच उत्तरासाठी भाव करणारी व्यक्ती ही बक्षिस जिंकू शकते. त्यामुळे भाव करण्याचे कौशल्य असलेले स्पर्धक' आता थांबायचे नाय' म्हणत या गेम शो मध्ये सहभागी होतात. लाखो रुपये जिंकण्याची संधी देणारा हा आगळा वेगळा गेमशो ठरला आहे.