Join us
Daily Top 2Weekly Top 5

भूमिका गुरुंगवर रवी किशनही फिदा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 11:58 IST

'निम्की'ची भूमिका साकारणं हा माझ्या जीवनातील एक समृध्द करणारा अनुभव होता. त्यातही रवी किशनसारखे कसलेले कलाकार या भूमिकेबद्दल तुमची स्तुती करतात तेव्हा माझ्या आत्मविश्वासात वाढ तर होतेच, पण अधिक चांगलं काम करण्यासाठीही हुरूप येतो.

'जिंदगी झंडबा, फिर भी घमंडबा' म्हणत रसिकांची मनं जिंकणारा भोजपुरी सुपरस्टार चक्क छोट्या पडद्यावरील 'निम्की मुखिया' मालिकेतील अभिनेत्री भूमिका गुरूंगवर फिदा झालेत.‘निम्की मुखिया’ मालिकेत निम्कीची मध्यवर्ती भूमिका उत्कृष्टपणे साकारून भूमिका गुरुंगने केवळ रसिकांचे उदंड प्रेम मिळवले आहे असे नव्हे, तर तिचे नाव घराघरात पोहोचले आहे. पण भोजपुरी आणि हिंदी चित्रपटांतील आघाडीचा नायक रवी किशन याने तिची अस्सल बिहारी उच्चारांबद्दल भरभरून स्तुती केल्यामुळे भूमिकाला सुखद आश्चर्याचा धक्काच बसला आहे.

रवी किशनने सोशल मीडियावर भूमिका गुरुंगशी संपर्क साधून तिच्या भूमिकेबद्दल खूप कौतुक केले. या मालिकेतील आपल्या प्रमुख भूमिकेसाठी भूमिकाने आपल्या संवादांत व्यक्त केलेल्या अस्सल बिहारी लहेजाची रवी किशनने प्रशंसा केली आहे. इतकेच नव्हे, तर ती भोजपुरी चित्रपटांमध्येही नायिकेच्या भूमिका साकारू शकते, असेही त्याने म्हटले आहे. आपण तिची ही मालिका नियमितपणे बघतो कारण यातील तिची भूमिका अतिशय रंगतदार असून ती तिने सहजतेने  उभी केली आहे, असे रवी किशनने म्हटले आहे.

रवी किशनसारख्या आघाडीच्या भोजपुरी अभिनेत्याने प्रशंसा केल्यामुळे भूमिका गुरुंगची ''आज मै उपर आसमाँ निचे'' अशीच तिची अवस्था झाली आहे. आपला आनंद व्यक्त करताना ती म्हणाली, “निम्कीची भूमिका साकारणं हा माझ्या जीवनातील एक समृध्द करणारा अनुभव होता. त्यातही रवी किशनसारखे कसलेले कलाकार या भूमिकेबद्दल तुमची स्तुती करतात तेव्हा माझ्या आत्मविश्वासात वाढ तर होतेच, पण अधिक चांगलं काम करण्यासाठीही हुरूप येतो. रवी किशन यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्याकडून पसंतीची पवती मिळणं ही माझी मोठी कमाई आहे. त्यामुळे मला आता नवी आशा आणि उत्साह मिळाला आहे.”

छोट्या पडद्यावर सध्या 'निम्की मुखिया' ही मालिका गाजते आहे. हटके कथानकामुळे या मालिकेला रसिकांनी डोक्यावर घेतलं आहे. रसिकांची आवडती मालिका म्हणून 'निम्की मुखिया' या मालिकेला पसंती मिळाली आहे. मालिकेतील सगळ्याच कलाकारांचा अभिनय रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे.

मालिकेत गरिमा सिंग ही मालिका सोडणार असल्याच्या बातम्या येत आहेत. काही दिवसांपासून  गरिमा मालिका सोडणार असल्याच्या फक्त चर्चाच रंगत होत्या. गरिमा यांच्या जागी कोण येणार याचीच उत्सुकता सर्वांना आहे. गरिमा यांनी ह्या मालिकेत अनारो देवीची भूमिका साकारली. मात्र, अशी बातमी आहे की अभिनेत्री नीलिमा सिंगच्या जागी  आता गरिमा यांची वर्णी लागली आहे.