Join us  

रात्रीस खेळ चालेमधील दत्ताची खऱ्या आयुष्यातील पत्नी आहे प्रसिद्ध अभिनेत्री... पाहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 7:15 AM

रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या दोन्ही सिझनमध्ये आपल्याला दत्ता म्हणजेच सुहास महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळतो.

ठळक मुद्देसुहासच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीचे नाव स्नेहा माजगांवकर असून ती दिसायला खूपच सुंदर आहे. स्नेहा देखील एक अभिनेत्री असून तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. ती नुकतीच झी युवाच्या कट्टी बट्टी या मालिकेत झळकली होती.

रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या दुसऱ्या सिझनला सध्या प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे. या मालिकेतील अण्णा, शेवंता, दत्ता, सविता, काशी, वच्छी, पांडू या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. या मालिकेत दत्ताची पत्नी सविता गरोदर असून काशीच्या मृत्यूचा शाप तिच्या होणाऱ्या बाळाला लागणार का याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. या मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले असून या मालिकेला टिआरपी देखील खूपच चांगला आहे.

रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या पहिल्या सिझनला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. अण्णांच्या घरात खरंच भूत आहे की कोणी घरातील सगळ्यांना उगाचच घाबरवत आहे हे गूढ मालिकेच्या शेवटच्या भागापर्यंत टिकून होते. या मालिकेतील काही कलाकार सध्या रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या दुसऱ्या सिझनमध्ये देखील प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत.

रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या दोन्ही सिझनमध्ये आपल्याला दत्ता म्हणजेच सुहास महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळतो. कधीतरी चिडणारा पण तितकाच प्रेमळ दत्ता प्रेक्षकांना प्रचंड आवडतो. या मालिकेत दत्ताची भूमिका सुहास शिरसाट साकारत असून या मालिकेत त्याची पत्नी सविता असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे.

सुहासच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीचे नाव स्नेहा माजगांवकर असून ती दिसायला खूपच सुंदर आहे. ती सोशल मीडियावर चांगलीच  अ‍ॅक्टिव्ह असते. तिचे आणि सुहासचे अनेक फोटो ती सोशल मीडियावर नेहमीच पोस्ट करत असते. स्नेहा देखील एक अभिनेत्री असून तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. ती नुकतीच झी युवाच्या कट्टी बट्टी या मालिकेत झळकली होती. माझे पती सौभाग्यवती या मालिकेतील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते.

सुहासने रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या आधी २०-२५ तरी चित्रपटांमध्ये काम केले. पण त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता या मालिकेनेच मिळवून दिली. विशेष म्हणजे तो मुळचा बीडचा असला तरी या मालिकेत अस्खलित मालवणी भाषेत बोलतो. 

टॅग्स :रात्रीस खेळ चाले