Join us

"आईने आजपर्यंत बॅकस्टेज जाऊन...", रसिका सुनीलचं रंगभूमीवर कमबॅक; शेअर केली पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2023 08:54 IST

'माझ्या नवऱ्याची बायको' फेम शनायाचं नवं नाटक, आईची होती 'ही' इच्छा

टेलिव्हिजनवरील सर्वात गाजलेल्या मालिकांपैकी एक म्हणजे 'माझ्या नवऱ्याची बायको'. नवरा बायकोच्या नात्यात तिसरीची एंट्री होते तेव्हा काय काय घडतं यावर ही मालिका होती. यातील 'शनाया' हे पात्र तर खूपच लोकप्रिय झालं. अभिनेत्री रसिका सुनीलने (Rasika Suneel) हे पात्र साकारलं होतं. बघायला गेलं तर खलनायिकेची ही व्यक्तिरेखा पण शनायाचं पात्र वेगळं होतं. थोडी वेडी पण कधी कधी गोड वाटणारी ही शनाया होती. रसिकाला 'शनाया' म्हणून वेगळी ओळख मिळाली. तर आता रसिका 'डाएट लग्न' या नाटकातून भेटायला येत आहे. रसिका नाटकात काम करणार म्हणल्यावर तिच्या आईला खूप आनंद झालाय.

रसिकाने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले, 'आईला नाटक बघायला खूप आवडतं. ती नेहमी थिएटरमध्ये जात असते. पण तिला मला नाटकात पाहण्याची खूप इच्छा होती. नाटक संपलं की प्रेक्षक विंगेत जाऊन कलाकारांना भेटतात, फोटो काढतात. पण आईने कधीच काढला नाही. कारण ती म्हणाली मी जेव्हा तुझं नाटक बघायला येईल तेव्हा बॅकस्टेजला येऊन तुझ्याबरोबर फोटो काढीन. आईची ही इच्छा आता पूर्ण होतेय.'

ती पुढे म्हणाली, 'मी याआधी नाटकात काम केलंय. पण मालिकांनंतर आता पुन्हा नाटकात काम करतेय यासाठी उत्सुक आहे. तसंच मला विजय केंकरेंच्या नाटकात काम करण्याची इच्छा होती. मी त्यांना एकदा याविषयी सांगितलंही होतं. मग डाएट लग्नसाठी त्यांनी मला विचारलं आणि मी लगेच हो म्हणाले.'

'डाएट लग्न' नाटकाचे प्रयोग ९ जूनपासून सुरु झालेत.  रसिका आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. विजय केंकरे यांनी हे नाटक दिग्दर्शित केलं असून हे त्यांचं १०१ वं नाटक आहे. 

टॅग्स :रसिका सुनिलमराठी अभिनेतानाटक