Join us
Daily Top 2Weekly Top 5

​रसिका सुनील बनली गायिका... या वेबसिरिजसाठी केले गायन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2018 16:08 IST

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील शनाया ही प्रेक्षकांची प्रचंड लाडकी आहे. ही भूमिका रसिका सुनील साकारत असून ती एक ...

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील शनाया ही प्रेक्षकांची प्रचंड लाडकी आहे. ही भूमिका रसिका सुनील साकारत असून ती एक खूप चांगली अभिनेत्री असल्याचे तिने या मालिकेद्वारे लोकांना दाखवून दिले आहे. या मालिकेत ती एका खलनायिकेच्या भूमिकेत असली तरी ही खलनायिका प्रेक्षकांना चांगलीच भावत आहे. मालिकेत शनाया आता पुढे काय करणार याची लोकांना उत्सुकता लागलेली असते. काहीजण तर तिला भेटल्यावर ती मालिकेत अशी का वागते असे विचारत तिच्यावर चिडतातदेखील. या सगळ्या कारणामुळे रसिका सुनील हे नाव काहीच दिवसांत प्रसिद्ध झाले आहे.प्रेक्षकांची ही लाडकी शनाया म्हणजेच रसिका सुनील ही एक चांगली अभिनेत्री असण्यासोबतच एक चांगली गायिका असल्याचे खूपच कमी जणांना माहिती आहे. तिने काही दिवसांपूर्वी तिच्या गायनाचा एक व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केला होता. या व्हिडिओला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. रसिकाने माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेच्या चित्रीकऱणाच्या दरम्यानच हा व्हिडिओ शूट केला होता. या मालिकेच्या सेटवरील मेकअप रूममध्ये ती गाताना दिसली होती. तुम बिना मोरा जिया लागेना... हे गाणे तिने या व्हिडिओत गायले असून या गाण्याला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. हा तिचा व्हिडिओ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला होता आणि त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यामुळे रसिका ही चांगली गायिका असल्याचे तिच्या फॅन्सना देखील कळले होते. पण आता तर रसिका प्रोफेशनल सिंगर बनली आहे. रसिकाने नुकतेच एका वेबसिरिजसाठी गायन केले आहे. रसिकाने रेकॉर्डिंगच्या वेळेचा तिचा फोटो इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केला आहे आणि शतजन्म शोधताना या वेबसरिजच्या तू असता तर या गाण्यासाठी मी गायन केले असल्याचे फोटोसोबत लिहिले आहे. तिची ही पोस्ट पाहून तिच्या फॅन्सना प्रचंड आनंद झाला आहे. तिच्या या गाण्याला देखील तिचे फॅन्स भरभरून प्रेम देणार यात काहीच शंका नाही. Also Read : शनाया उर्फ रसिका सुनीलचा हा सेक्सी अंदाज