Join us
Daily Top 2Weekly Top 5

रश्मी देसाई आणि अभिनेता नंदीश संधूच्या घटस्फोटाला कारणीभूत आहे ही मिस इंडिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 19:24 IST

नंदिशसोबत घटस्फोट घेण्यामागील कारण रश्मीने तिला अनेक मुलींशी प्रेमसंबंध असल्याचे सांगितले होते

बिग बॉस 13 ची कंटेस्टेंट आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाई तिच्या पर्सनल लाईफला घेऊन चर्चेत असते. रश्मीचे वैवाहिक आयुष्य फारसे यशस्वी राहिले नाही. करिअर पिकवर असताना रश्मीने अभिनेता नंदीश संधूसोबत लग्नगाठ बांधली. ‘उतरण’ या मालिकेच्या सेटवर रश्मी व नंदीश जवळ आलेत आणि दोघांत प्रेम फुलले. पुढे दोघांचे लग्न झाले. पण वर्षभरातच या रश्मी व नंदिशच्या कुरबुरीच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. लग्नाच्या चार वर्षांनंतर रश्मी व नंदीश विभक्त झालेत.

नंदिशसोबत घटस्फोट घेण्यामागील कारण रश्मीने तिला अनेक मुलींशी प्रेमसंबंध असल्याचे सांगितले होते. माजी मिस इंडिया अंकिता शोर हे रश्मी आणि नंदीशच्या घटस्फोटाचे मुख्य कारण होते. ज्यामुळे नंदीश आणि रश्मीच्या नात्यात दरी निर्माण झाली होती. 

अंकिताने २०११ साली मिस इंडियाचे विजेतेपद जिंकले होते. २०१२ मध्ये अंकिताने शाहरुख खान आणि रणबीर कपूर यांच्यासमवेत फिल्मफेअर अवॉर्ड्स होस्ट केले होते. तिचे सौंदर्य कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. अंकिता फिटनेसच्या बाबतीत खूपच अर्लट असते. 

टॅग्स :रश्मी देसाई