राणी मुखर्जी झाली डीआयडी लिटिल मास्टर्सची सूत्रसंचालिका तमन्नावर फिदा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2018 15:57 IST
छोट्या पडद्यावरील ‘डीआयडी लिटिल मास्टर्स’ कार्यक्रमाच्या छोटे स्नर्धकांनी सादर केलेल्या अप्रतिम नृत्याने प्रेक्षकांना गेले अनेक आठवडे फुल ऑन एंटरटेन ...
राणी मुखर्जी झाली डीआयडी लिटिल मास्टर्सची सूत्रसंचालिका तमन्नावर फिदा!
छोट्या पडद्यावरील ‘डीआयडी लिटिल मास्टर्स’ कार्यक्रमाच्या छोटे स्नर्धकांनी सादर केलेल्या अप्रतिम नृत्याने प्रेक्षकांना गेले अनेक आठवडे फुल ऑन एंटरटेन केले आहे.या आठवड्यात सा-यांची लाडकी अभिनेत्री राणी मुखर्जी ही आपल्या ‘हिचकी’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या कार्यक्रमात सहभागी होत असल्याने प्रेक्षकांना काही सुंदर डान्स स्टाइल पाहायला मिळतील. यावेळी राणी मुखर्जीने सांगितले की तिला लहान मुले फार आवडतात.‘डीआयडी लिटिल मास्टर्स’ कार्यक्रमात सादर होणारे सगळे परफॉर्म मी पाहते.या कार्यक्रमात सर्वच स्पर्धक उत्कृष्ट नृत्ये सादर करतात.आपल्या विनोदाच्या अचूक टायमिंगने आणि सहसूत्रधार जय भानुशाली याच्याबरोबर केलेल्या खुसखुशीत टिप्पणीने सूत्रधार तमन्नाने राणी मुखर्जीला चांगलेच प्रभावित केले.इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ या कार्यक्रमात स्पर्धक असल्यापासूनच तमन्ना आपला भावदर्शी चेहरा आणि नाट्यपूर्ण कृतींनी परीक्षकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत असे.या कार्यक्रमाच्या संपूर्ण चित्रीकरणादरम्यान राणी मुखर्जीवर तमन्नाचा प्रभाव वाढत असल्याचे दिसून येत होते. राणी म्हणाली, “मी आतापर्यंत अनेक टीव्ही कार्यक्रमांमध्ये भाग घेतला असून ब-याच पुरस्कार वितरण समारंभांमध्ये उपस्थित राहिले आहे. पण तमन्नासारखी प्रामाणिक आणि उत्तम सूत्रधार मला कुठेच दिसली नाही.या संपूर्ण कार्यक्रमाच्या चित्रीकरणादरम्यान मी तिला पाहात होते आणि आता मी तिची चाहती बनले आहे.”किंबहुना चित्रीकरण संपल्यावर जाण्यापूर्वी राणीने तमन्नाची मुद्दाम भेट घेतली आणि तिच्याबरोबर काही छायाचित्रेही काढली. जाताना तिने तमन्नाला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यावर तमन्ना भारावून गेली.येत्या वीकेण्डला ‘डीआयडी लिटिल मास्टर्स’ कार्यक्रमातील ब्लॉकबस्टर बच्चे कंपनी राणी मुखर्जीसाठी ‘डिस्कोवाले खिसको’ गाण्यावर अफलातून नृत्य सादर करताना प्रेक्षकांना पाहायला मिळेल.याशिवाय राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी’ आणि ‘साथियाँ’ या चित्रपटांतील ‘कभी अलविदा ना केहना’, ‘तेरा चेहरा जब नजर आए’,‘मैं तुमको नहीं छोडूंगी’ या लोकप्रिय गाण्यांवर बीर शेर्पा, जीतूमोनी,वैष्णवी आणि तन्मय या स्पर्धकही थिरकताना पाहायला मिळणार आहे.