Join us
Daily Top 2Weekly Top 5

'रंग माझा वेगळा'मधील सौंदर्याची बहिणदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री, दोघींनी केलंय या मालिकेत काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 18:29 IST

हर्षदा खानविलकरची बहिणदेखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे, हे फार कमी लोकांना माहित आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका रंग माझा वेगळा (Rang Maza Vegala) गेल्या कित्येक आठवड्यांपासून टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या स्थानावर आहे. या मालिकेतील कार्तिक, दीपा, सौंदर्या, ललित, कार्तिकी आणि दीपिका अशा सर्वच पात्रांना प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. या मालिकेत सौंदर्याची भूमिका अभिनेत्री हर्षदा खानविलकर (Harshada Khanvilkar)ने निभावली आहे. हर्षदा खानविलकर यांनी बऱ्याच मालिकेत काम केले आहे. हर्षदा खानविलकरची बहिणदेखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे, हे फार कमी लोकांना माहित आहे. 

मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री हर्षदा खानविलकर अभिनेत्री मृणाल देशपांडेची बहीण आहे. तसेच मृणाल देशपांडे अभिनेत्री समिधा गुरूची थोरली बहिण आहे. समिधा गुरू छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. मृणाल आणि समिधा या दोघीही सख्ख्या बहिणी आहेत. खरेतर हर्षदा खानविलकर मृणाल देशपांडेची मानलेली बहिण आहे. सख्ख्या बहिणी नसल्या तरी त्यांचे एकमेकींवर खूप प्रेम आहे.

हर्षदा खानविलकर आणि मृणाल देशपांडे यांनी ‘पुढचे पाऊल’ या मालिकेत एकत्र काम केले होते. या मालिकेच्या शूटिंग दरम्यान हर्षदा आणि मृणाल या दोघींमध्ये छान बॉण्डिंग निर्माण झाले.. हे नाते पुढे आणखी घट्ट होत गेले आणि त्याचे रूपांतर मानलेल्या बहिणीच्या नात्यात झाले. सोशल मीडियावर त्या दोघींचे बरेच एकत्र फोटो पाहायला मिळत असतात.  

रंग माझा वेगळा मालिका सध्या रंजक वळणावर आली आहे. मालिकेत सध्या शाळेतील नाटकाच्या निमित्ताने दीपा, कार्तिक, कार्तिकी आणि दीपिका एकत्र वेळ व्यतित करत आहेत. या नाटकाच्या निमित्ताने दीपा आणि कार्तिक यांच्या नात्यातील दुरावा कमी होईल का आणि त्यांचे चौकोनी कुटुंब पूर्ण होईल का, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

टॅग्स :स्टार प्रवाह