‘रंग माझा वेगळा’ मालिकेचं कथानक आणि कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे मालिका रंजक बनली. रसिकांच्या आवडत्या मालिकेच्या यादीत या ही मालिकेचा समावेश आहे. मालिकेतल्या रंजक वळणामुळे रसिकही मालिकेला खिळून आहेत. मालिकेतले कलाकारही तितकेच लोकप्रिय बनले आहेत.
मालिकेत कार्तिकच्या वडिलांच्या भूमिकेत झळकत असलेले अभिनेते श्रीरंग देशमुखही प्रचंड लोकप्रिय आहेत. प्रचंड मोठा त्यांचा चाहता वर्ग आहे. या मालिकेआधीही त्यांनी विविध मालिकेत भूमिका साकारत रसिकांचे मनोरंजन केले आहे.
“पुढचं पाऊल” मालिकेतल्या त्यांच्या भूमिकेला सर्वाधिक पसंती मिळाली होती.मालिकाच नाही तर नाटकंही त्यांनी गाजवली आहेत. 'अविष्कार', 'सतरंगी रे', 'अ पेइंग घोस्ट', 'सिटीझन' अशा नाटकामध्ये आणि सिनेमांमध्ये त्यांनी आपली छाप पाडली आहे. एक अभिनेता म्हणूनच नाहीतर एक लेखक आणि दिग्दर्शन म्हणूनसुध्दा ते प्रसिद्ध आहेत.“एक निर्णय” या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन श्रीरंग देशमुख यांनीचे केले होते.
जितके प्रसिद्ध श्रीरंग देशमुख आहेत. तितकेच प्रसिद्ध त्यांची पत्नीदेखील आहे. त्यांची पत्नीही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अभिनेत्री सीमा देशमुख त्यांची पत्नी आहे. सीमा यांनीही मराठी मालिका, नाटक आणि सिनेमात भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या बऱ्याच मालिकांना रसिकांची पसंती मिळवली होती. त्यापैकी “देवा शप्पथ” मालिकाही प्रचंड पसंती उतरली होती.
त्याशिवाय “एका लग्नाची दुसरी गोष्ट” सुपरहिट ठरली. मालिका सिनेमांप्रमाणेच नाटकांतही त्यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. 'अलिबाबा आणि चाळिशीतले चोर', 'ऑल द बेस्ट', 'जागो मोहन प्यारे' ही त्यांची सुपरहिट आणि लोकप्रिय नाटके आहेत.'उचला रे उचला', 'बदाम राणी गुलाम चोर', 'तुझं तू माझं मी', 'टाइम प्लिज', 'मला काहीच प्रॉब्लेम नाही' हे त्यांचे गाजलेले सिनेमे आहेत.
सीमा देशमुख दिसायलाही फार सुंदर आहे. सीमा यांच्या अभिनयाप्रमाणे त्यांच्या सौंदर्यावरही चाहते फिदा असतात. आजही त्यांचे सौंदर्य अबाधित आहे.श्रीरंग आणि सीमा देशमुख यांना एक मुलगा आहे. रोहन श्रीरंग देशमुख असे त्याचे नाव आहे, रोहनसुद्धा इंडस्ट्रीत म्युझिक मिक्सिंगचे काम करत आहे. “एक निर्णय” सिनेमासाठी त्यानेच म्युझिक मिक्सिगची जबाबदारी पार पाडली होती.