Join us

​रणबीर कपूरने संजय दत्तच्या बायोपिकसाठी डॉ.संकेत भोसलेकडून घेतल्या टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2017 17:19 IST

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर संजय दत्तची भूमिका साकारत ...

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर संजय दत्तची भूमिका साकारत आहे. या चित्रपटासाठी त्याने केस वाढवले असून त्याचा संपूर्णपणे लूक हा संजयसारखाच केलेला आहे. या चित्रपटासाठी सध्या तो प्रचंड मेहनत देखील घेत आहे. याच चित्रपटाचे चित्रीकरण गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या चित्रपटासाठी रणबीरने काही दिवसांपूर्वी डॉ.संकेत भोसलेची भेट घेतली होती आणि त्याच्याकडून काही टिप्स देखील घेतल्या आहेत.डॉ. संकेत भोसले हा मिमिक्री करण्यात पटाईत आहे. संजय दत्तची मिमिक्री तर तो खूपच चांगल्या पद्धतीने करतो. त्याच्या या मिमिक्रीचे अनेक फॅन आहे. संकेत हा एक खूप चांगला कलाकार असल्याचे रणबीर कपूरचे देखील म्हणणे आहे. रणबीरला संकेत खूपच आवडतो. संजय दत्तची तो खूप चांगली मिमिक्री करतो असे त्याचे म्हणणे आहे. संजय दत्तच्या बायोपिकच्या निमित्ताने रणबीरने संकेतची नुकतीच भेट घेतली होती. याविषयी संकेत सांगतो, रणबीर खूपच चांगला आहे. त्याला लोकांकडून शिकायला खूपच आवडते. हा कलाकार माझ्या इतका श्रेष्ठ नाहीये. तो आताच आला आहे तर मी याला कसे काही विचारू शकतो असा विचार करणारा तो नाहीये. संजय दत्त यांच्या चित्रपटाच्या निमित्ताने त्याने माझ्यासोबत काही वेळ घालवला. तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण त्याने माझ्याकडून काही टिप्स देखील घेतल्या. संजय दत्तची ज्याप्रमाणे मी मिमिक्री करतो, त्याप्रकारे ते खऱ्या आय़ुष्यात नाहीत. पण कॉमेडी करण्याची माझी वेगळी स्टाइल असल्याने मी वेगळ्या प्रकारे त्यांची मिमिक्री करतो. Also Read : आता कृष्णा अभिषेक सुरू करणार ड्रामा कंपनी?वाचा सविस्तर