Join us  

Shweta Rastogi: ‘श्री कृष्णा’ मालिकेतील छोटी ‘राधा’ आठवते? आता दिसते अशी, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 1:52 PM

Shree Krishna : ‘श्री कृष्णा’ या मालिकेत राधेची भूमिका साकारणाऱ्या दोन्ही अभिनेत्री तुम्हाला आठवत असतीलच. छोट्या राधेची भूमिका अभिनेत्री श्वेता रस्तोगीने (Shweta Rastogi) साकारली होती. तर अभिनेत्री रेश्मा मोदीने मोठी राधा साकारली होती.

रामानंद सागर यांची ‘श्री कृष्णा’ ( Shree Krishna) ही  मालिका आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहे. दूरदर्शनवरच्या या मालिकेनं प्रत्येकाला वेड लावलं होतं. या मालिकेतील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांच्या स्मरणात आहे, ते म्हणूनच. या मालिकेत राधेची भूमिका साकारणाऱ्या दोन्ही अभिनेत्री तुम्हाला आठवत असतीलच. छोट्या राधेची भूमिका अभिनेत्री श्वेता रस्तोगीने (Shweta Rastogi)  साकारली होती. तर अभिनेत्री रेश्मा मोदीने मोठी राधा  साकारली होती. आज आम्ही तुम्हाला छोट्या राधेबद्दल अर्थात श्वेता रस्तोगीबद्दल सांगणार आहोत.

 1973 साली जन्मलेली श्वेता रस्तोगी मेरठची राहणारी आहे.  अनेक मालिकांमध्ये तसंच चित्रपटांमध्ये तिने बालकलाकार म्हणून भूमिका केल्या.  श्वेताला घरात लाडानं चीना या नावानं बोलवतात. श्वेता चार वर्षांची असल्यापासून मालिकांमध्ये अभिनय करत आहे. या शिवाय बालकलाकार म्हणून तिनं चित्रपटांमध्येही काम केलं आहे. 

श्रीकृष्णाच्या ऑडिशनमध्ये फेल झाली होती श्वेता...होय, ऐकायला विचित्र वाटेल पण ‘श्री कृष्णा’च्या ऑडिशनमध्ये श्वेता फेल झाली होती. रामानंद सागर ‘श्रीकृष्णा’मधील राधाच्या रोलसाठी एका किशोरवयीन मुलीच्या शोधात होते. यादरम्यान त्यांनी श्वेताचं ऑडिशन घेतलं होतं. पण पहिल्या ऑडिशनमध्ये रामानंद सागर यांना ती फार आवडली नव्हती. तिची डायलॉग डिलिव्हरी रामानंद सागर यांना आवडली नव्हती. पण हो, तिचा साधेपणा, तिचं सौंदर्य मात्र त्यांना भावलं होतं. अन्य कुणीही राधेच्या भूमिकेत फिट बसत नसल्यानं अखेर रामानंद यांनी श्वेताला आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांनी तिला कृष्णासोबत महारासमध्ये डान्स करून दाखवायला सांगितलं आणि इथेच तिने ही भूमिका जिंकली. कारण श्वेता क्लासिकल डान्सर होती. ती या ऑडिशनमध्ये पास झाली आणि तिला राधेची भूमिका मिळाली. तिने या भूमिकेचं सोनं केलं. 

रामानंद सागर रोज करायचे चरणस्पर्शशूटींगदरम्यान श्वेता व स्वप्निल जोशी राधा-कृष्णाच्या गेटअपमध्ये असायचे. रामानंद सागर रोज शूटींग सुरू होण्याआधी राधा-कृष्णाच्या गेटअपमधील श्वेता व स्वप्निलचे चरणस्पर्श करून आशीवार्द घ्यायचे. श्वेता व स्वप्निलने साकारलेली ही राधाकृष्णाची जोडी आत्तापर्यंतची सर्वात बेस्ट जोडी मानली जाते.

आता कुठे आहे, काय करते श्वेता?

‘श्रीकृष्णा’ मालिकेनंतर श्वेतानं 1995 मध्ये एका तमीळ चित्रपटात भूमिका केली होती. त्यानंतर तिनं पुन्हा मालिकांवर लक्ष केंद्रीत केलं. 1997 मध्ये जय हनुमान, 2004 मध्ये केसर, 2005 मध्ये वो रहनेवाली महलों की, 2006 मध्ये थोडी सी जमीं थोडा सा आसमान, स्त्री तेरी यही कहानी सारख्या मालिकांमध्ये श्वेतानं वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय श्री गणेशसारख्या मालिकेत ती दिसली होती. श्वेता अजूनही मालिकांमध्ये भूमिका करत आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीस्वप्निल जोशी