Join us

राखी सोज्वळ भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2016 12:29 IST

राखी टंडनने अनेक मालिकेत कॉमेडी भूमिका साकारल्या आहेत. हिना या मालिकेत राखीने खूप वेगळी भूमिका साकारली होती. या मालिकेत ...

राखी टंडनने अनेक मालिकेत कॉमेडी भूमिका साकारल्या आहेत. हिना या मालिकेत राखीने खूप वेगळी भूमिका साकारली होती. या मालिकेत ती नकारात्मक भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. राखी आता गंगा या मालिकेत एका वेगळ्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. गंगा या मालिकेत ती एक गंभीर भूमिका साकारणार असून या मालिकेतील तिचा लूकही खूप वेगळा आहे. राखी ही नेहमीच रंगीबेरंगी कपडे आणि अतिशय भडक मेकअपमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ती या मालिकेत एका विधवेची भूमिका साकारत असल्याने या मालिकेतील तिची वेशभूषा ही अतिशय साधी आहे. इतक्या वर्षांनंतर एक खूपच वेगळी आणि चांगली भूमिका साकारायला मिळत आहे याचे समाधान वाटत आहे असे राखी सांगते.