रजनी म्हणणार मे आय कम इन मॅडम ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2016 12:33 IST
संजनाला इम्प्रेस करण्यासाठी आपण दाक्षिणात्य सुपरस्टार रजनिकांतचे खूप चांगले मित्र असल्याचे साजनने सांगितले आहे. पण ही गोष्ट आता त्याच्या ...
रजनी म्हणणार मे आय कम इन मॅडम ?
संजनाला इम्प्रेस करण्यासाठी आपण दाक्षिणात्य सुपरस्टार रजनिकांतचे खूप चांगले मित्र असल्याचे साजनने सांगितले आहे. पण ही गोष्ट आता त्याच्या अंगाशी येणार आहे. तो रजनिकांतला ओळखतो हे कळल्यावर रजनिकांचे फॅन त्याच्या घरासमोर जमा होणार आहेत आणि रजनिकांतला भेटण्याची इच्छा व्यक्त करणार आहेत. रजनिकांतला कुठून आणायचे हा पेचप्रसंग साजनच्या पुढे उभा राहाणार आहे. तो रजनिकांतच्या ड्युप्लिकेटला रजनिकांत म्हणून सगळ्यांना भेटवणार आहे. रजनिकांतचा ड्युप्लिकेट चेन्नई येथे राहात असून काल मुंबईत येऊन त्याने खास या मालिकेसाठी चित्रीकरण केले.