Join us

रजनी चालवणार रिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2016 12:52 IST

बहू हमारी रजनी_कांत या मालिकेत रजनीची भूमिका साकारणारी रिद्धिमा पंडित प्रेक्षकांना कधी कामवालीच्या तर कधी एखाद्या सौंदर्यवतीच्या तर कधी एखाद्या वेगळ्याच ...

बहू हमारी रजनी_कांत या मालिकेत रजनीची भूमिका साकारणारी रिद्धिमा पंडित प्रेक्षकांना कधी कामवालीच्या तर कधी एखाद्या सौंदर्यवतीच्या तर कधी एखाद्या वेगळ्याच भूमिकेत पाहायला मिळते. आता रजनी रिक्षाचालक बनणार आहे. पहिल्याच मालिकेत इतक्या साऱ्या भूमिका साकारायला मिळत असल्याने सध्या रिद्धिमा खूपच खूश आहे. रिद्धिमा सांगते, या मालिकेतील माझी वेशभूषा आणि रंगभूषा ही तज्ज्ञ व्यक्तिंकडून करून घेण्यात आलेली आहे. तसेच या भूमिकेसाठी मी माझ्या आवाजातही थोडासा बदल करणार आहे. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या पुरुषाची वैशभूषा केलेली आहे. माझा हा लूक माझ्या आईला खूपच आवडला असे रिधिमा सांगते.