Join us

लोकाग्रहास्तव पुन्हा भेटीला येणार 'राजा शिवछत्रपती', वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 07:00 IST

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे.

कोरोनाचं संकट सध्या संपूर्ण जगावर थैमान घालत आहे. सर्व व्यवहार ठप्प असल्यामुळे मालिकांचं शूटिंगही थांबलं आहे. लॉकडाऊनमुळे घरात बसलेल्या लोकांचे मनोरंजन व्हावे यासाठी काही लोकप्रिय मालिकांचं वाहिन्यांवर पुन:प्रक्षेपण सुरु केले आहे.  लोकाग्रहास्तव स्टार प्रवाहवरील राजा शिवछत्रपती आणि आंबटगोड या लोकप्रिय मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. शुक्रवार ३ एप्रिलपासून दररोज सायंकाळी ५ वाजता आंबटगोड आणि ५.३० वाजता राजा शिवछत्रपती या लोकप्रिय मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

 छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. शिवरायांचा जाज्वल्य इतिहास प्रत्येक पिढीला भविष्यातील नवे क्षितिज गाठण्यासाठी सदैव प्रेरणा देत असतो. प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी निर्मिती केलेल्या या मालिकेचं दिग्दर्शन हेमंत देवधर यांनी केलं आहे. अजय अतुल यांनी संगीतबद्द केलेले मालिकेचं शीर्षकगीत प्रत्येक शिवप्रेमीच्या मनामनात आहे. डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारलेले छत्रपती शिवाजी महाराज, मृणाल कुलकर्णी यांच्या जिजाऊ, अविनाश नारकर यांचे शहाजी राजे, यतीन कार्येकर यांचा औरंगजेब आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. हेच सोनेरी क्षण पुन्हा एकदा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहेत.

टॅग्स :स्टार प्रवाह