Join us  

चर्चेत राहण्यासाठी राहुल वैद्य करतोय लाखो रुपये खर्च? जस्मिन भसिनचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 4:27 PM

'बिग बॉस १४' शेवटच्या टप्यात शो पोहचल्यामुळे स्पर्धकही आता विजेतेपद जिंकण्यासाठी अधिक मेहनत करताना दिसत आहेत. बिग बॉसकडून देण्यात येणारा प्रत्येक टास्क स्पर्धकांमध्ये जिंकण्याची चढाओढ सुरु असल्याचे पाहायला मिळतंय.

'बिग बॉस १४' शेवटच्या टप्यात शो पोहचल्यामुळे स्पर्धकही आता विजेतेपद जिंकण्यासाठी अधिक मेहनत करताना दिसत आहेत. बिग बॉसकडून देण्यात येणारा प्रत्येक टास्क स्पर्धकांमध्ये जिंकण्याची चढाओढ सुरु असल्याचे पाहायला मिळतंय. गुगलने तर आधीच बिग बॉस १४ विजेता घोषित केल्यानंतर रसिकांमध्येही विजेता कोण होणार याकडेच अधिक लक्ष लागल्याचे पाहायला मिळत आहे. घरात स्पर्धक जिंकण्यासाठी प्रचंड मेहनत करत आहे. रसिकांचे मनोरंजन करत लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहे. 

प्रत्येकजण आपल्या मेहनत करतोय, असे असताना मात्र गायक राहुल वैद्यने रसिकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी वेगळाच फंडा वापरत असल्याच्या चर्चा घरातच सुरु झाल्या आहेत. जास्मिन भसीनने सांगितले की, सोशल मीडियावर रुबीना आणि राहुल वैद्या दोघांची अधिक चर्चा पाहायला मिळते. इतकेच नाही तर पब्लिसिटीमध्ये राहण्यासाठी, सोशल मीडियावर ट्रेण्डमध्ये राहण्यासाठी राहुल वैद्य प्रत्येक आठवड्याला ५ लाख रुपये खर्च करत असल्याचे तिने म्हटले आहे.

सध्या राहुल आणि रुबीना दिलैक दोघांची लोकप्रियता सोशल मीडियावर तुफान असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र तरीही रुबीना दिलैकच बिग बॉस १४ ची विजेता बनणार असल्याचे भाकितच चाहत्यांनी वर्तवले आहे. गुगलनेही त्यांच्या विजेत्यांनी नावं जाहीर केली होती त्यातही रुबीनाचेच नाव होते. त्यामुळे येत्या काळाता बिग बॉसचा विजतो कोण बनणार हे पाहणे रंजक असणार आहे.

'इंडियन आयडॉल' शोमुळेच राहुल वैद्य प्रकाशझोतात आला. याच शोमुधे त्याला पैसा, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळाली आहे. इंडियन ऑडलमध्ये आल्यानंतर राहुल वैद्यचे नाव अनेक तरुणींशी जोडण्यात आले. काही वर्षांपूर्वी अशीदेखील चर्चा होती की राहुल गायिका अलका याग्निक यांची मुलगी श्रेया कपूरला डेट करत होता. त्यानंतर राहुलचे नाव टीव्ही अभिनेत्री दिशा परमारसोबत तो नात्यात असून घरातच त्याने प्रेमाची कबुली दिली होती.

अभिनयात सुद्धा राहुलने आजमावले नशीब 

सोनू निगम, मीका सिंग आणि शानसारखे राहुल वैद्यने सुद्धा अभिनयात नशीब आजमावले आहे. 2016मध्ये राहुलने एक इंडो बांग्लादेशी सिनेमा साईन केला होता. या सिनेमात राहुल वैद्यने बंगाली कलाकार रिया चटर्जी आणि रिया सेनसोबत काम केले होते. राहुल वेद्यने अनेक म्युझिक अल्बमला आवाज दिला आहे. राहुल बॉलिवूडमध्ये अनेक गाणी गायली आहेत.

टॅग्स :बिग बॉस १४जास्मीन भसीन