कवचमध्ये पुनियाची एंट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2016 13:51 IST
कवच... काली शक्तियों से या मालिकेत राजबीर आणि परीचा घटस्फोट होणार आहे. राजबीरच्या आयुष्यासाठी त्याच्यापासून दूर जाण्याचा विचार परीने ...
कवचमध्ये पुनियाची एंट्री
कवच... काली शक्तियों से या मालिकेत राजबीर आणि परीचा घटस्फोट होणार आहे. राजबीरच्या आयुष्यासाठी त्याच्यापासून दूर जाण्याचा विचार परीने केला आहे आणि आता ती अरहानसोबत तिच्या नव्या आयुष्याला सुरुवातदेखील करणार आहे. तर दुसरीकडे परीसोबत घटस्फोट झाल्यानंतर आता राजबीर दुसरे लग्न करणार आहे. या मालिकेत आता पवित्र पुनियाची एंट्री होणार आहे. तिचे राजबीरशी लग्न होणार आहे. पवित्राने स्पिटव्हिला या कार्यक्रमापासून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर ये है मोहोब्बते या मालिकेत तिने साकारलेली नकारात्मक भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. आता ती पुन्हा एकदा नकारात्मक भूमिकेतच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.