Join us
Daily Top 2Weekly Top 5

पुनीश शर्मा अन् बंदगी कालराला काढले घराबाहेर, कारण वाचून तुम्हाला धक्का बसेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2018 19:54 IST

टीव्ही जगतातील सर्वाधिक वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो बिग बॉसचा सीजन ११ संपून आता बराच वेळ झाला आहे. परंतु या सीजनमध्ये ...

टीव्ही जगतातील सर्वाधिक वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो बिग बॉसचा सीजन ११ संपून आता बराच वेळ झाला आहे. परंतु या सीजनमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांबद्दलच्या बातम्या अजूनही माध्यमांमध्ये चर्चिल्या जात आहेत. त्यामध्ये पूनीश शर्मा आणि बंदगी कालरा यांच्यातील नात्यावरून रोज काही ना काही वृत्त समोर येत आहे. त्यातच आता एक अशी बातमी समोर आली ज्यामुळे या दोघांच्याही चाहत्यांना धक्का बसेल. होय, वृत्तानुसार बंदगी कालरा अन् पुनीश शर्माला त्यांच्या घरमालकाने बाहेरचा रस्ता दाखविला आहे. याचे कारण दोघांचे मद्यपान करणे असल्याचे बोलले जात आहे. ही बातमी समोर येताच दोघांच्याही चाहत्यांना जबरदस्त धक्का बसला आहे. याविषयी पुनीश शर्मा एका वेबसाइटला याबाबतचा खुलासा करताना म्हटले की, ‘पहिली गोष्ट म्हणजे आम्ही एकत्र राहात नाही, मी गेल्या काही काळापासून एका हॉटेलमध्ये राहात नाही. अगोदर बंदगी घाटकोपरला राहात होती, परंतु आता ती अंधेरीला शिफ्ट झाली आहे. बंदगी घाटकोपरहून अंधेरीला शिफ्ट झाल्यामुळेच अशाप्रकारच्या बातम्या समोर येत आहेत. वास्तविक कामासाठीच बंदगीने शिफ्ट केले आहे. कारण आता अंधेरीवरून तिला अधिक  प्रवास करण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे मीडियामध्ये ज्या काही बातम्या येत आहेत, त्या अफवा आहेत.’ALSO READ पुनीश शर्मा अन् बंदगी कालराचा दिसला रोमॅण्टिक अंदाज; असा सेलिब्रेट केला Rose day!पुढे बोलताना पुनीश याने हेदेखील स्पष्ट केले की, अद्यापपर्यंत आम्ही एकत्र राहण्याचा विचार केला नाही. पुनीशच्या या खुलाशानंतर कदाचित त्याच्या चाहत्यांना दिलासा मिळाला असेल. परंतु यामध्ये वास्तव काय हे पुनीश आणि बंदगीलाच ठावूक असल्याने या दोघांच्या आणखी काय घडामोडी घडतील हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान रोज डेला पुनीश आणि बंदगीने एक रोमॅण्टिक फोटो शेअर केला होता.