Join us

प्रिन्स लवकरच मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2016 11:50 IST

रोडीज, स्पिल्टव्हिला, बिग बॉस यांसारख्या विविध रिअॅलिटी शोचे विजेतेपद मिळवलेल्या प्रिन्स नरुलाला चांगलेच फॅन फॉलॉविंग आहे. प्रिन्स अनेक रिअॅलिटी ...

रोडीज, स्पिल्टव्हिला, बिग बॉस यांसारख्या विविध रिअॅलिटी शोचे विजेतेपद मिळवलेल्या प्रिन्स नरुलाला चांगलेच फॅन फॉलॉविंग आहे. प्रिन्स अनेक रिअॅलिटी शो केल्यानंतर आता मालिकेकडे वळणार आहे. तो एका मालिकेत प्रमुख भूमिका साकारणार असून त्याच्यासोबत नायिका म्हणून एक नवीन चेहरा झळकणार आहे. वजनाने जास्त असलेल्या एका मुलीची कथा प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळणार आहे. रिअॅलिटी शोनंतर मालिकेत काम करण्यास सध्या प्रिन्स चांगलाच उत्सुक आहे.