प्रिंस नरुला बनणार रेसलर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2016 13:50 IST
रियालिटी शोचा बादशाह अशी ओळख असणारा प्रिंस नरुला लवकरच छोट्या पडद्यावर एका रेसलरच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. छोट्या पडद्यावरील ...
प्रिंस नरुला बनणार रेसलर
रियालिटी शोचा बादशाह अशी ओळख असणारा प्रिंस नरुला लवकरच छोट्या पडद्यावर एका रेसलरच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. छोट्या पडद्यावरील 'बढो बहू' या आगामी शोमध्ये प्रिंस ही प्रमुख भूमिका साकारणार आहे. प्रिंसनं गेल्या काही महिन्यांमध्ये अभिनयावर बरीच मेहनत घेतलीय. त्यासाठी त्यानं अभिनयाच्या कार्यशाळेत चार महिने घाम गाळल्याचंही समजतंय. आता रेसलरच्या भूमिकेसाठी प्रिंस रेसलिंगचं प्रशिक्षण घेतोय.यासाठी बराच काळ तो जिममध्ये घालवतोय. आता प्रिंसच्या या मेहनतीला किती यश मिळतं ही मालिका रसिकांच्या भेटीला आल्यावरच कळेल. याआधी प्रिंसनं स्प्लिस्ट्स व्हिला, एमटीव्ही रोडीज, बिग बॉस-9 या रियालिटी शोचं जेतेपद पटकावलंय.