Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘कसौटी जिंदगी के’मध्ये प्रेरणाचा झाला मेकओव्हर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 06:30 IST

या मालिकेच्या कथानकाला मिळालेल्या एका अनपेक्षित वळणात प्रेक्षकांनी पाहिले की अनुरागने आपल्या प्रेमाचा त्याग करीत कोमोलिकाशी विवाह केला.

मेकओव्हर, लूक बदलणे, स्टाइल स्टेटमेंटमध्ये बदल अशा गोष्टी अनेकदा रिअल लाईफमध्ये अभिनेत्रींबद्दल ऐकायला मिळतात. अनेकदा भूमिकेची गरज म्हणूनही मेकओव्हर केला जातो. अगदी भूमिकेसाठीच  टीव्ही अभिनेत्री लूक चेज केला आहे.‘स्टार प्लस’वरील ‘कसौटी जिंदगी के’ या मोठा चाहतावर्ग लाभलेल्या मालिकेने प्रेक्षकांना टीव्हीच्या पडद्याला खिळवून ठेवले आहे. या मालिकेच्या कथानकाला मिळालेल्या एका अनपेक्षित वळणात प्रेक्षकांनी पाहिले की अनुरागने आपल्या प्रेमाचा त्याग करीत कोमोलिकाशी विवाह केला. त्याच्या या कृतीने प्रेरणाचे जीवनात उलथापालथ झाली असून तिचा प्रेमभंग झाला आहे. पण ती आता या विरोधात ठामपणे उभी राहण्याचे ठरवते आणि या घरातील पहिली सून म्हणून आपला अधिकार  गाजविण्याचा निर्णय घेते. त्यासाठी ती आपला संपूर्ण  कायापालट करते आणि सौ. बसू म्हणून अनुरागला सामोरी जाते.

अनुराग आणि प्रेरणाने एका मंदिरात गपचुप लग्न केलेले असते, ही गोष्ट अनुराग आणि कोमोलिकाच्या लग्नापूर्वी उघड केली जाते. या मालिकेशी संबंधित एका सूत्राने सांगितले, “अनुरागकडून प्रेमभंग झाल्यानंतर प्रेरणा स्वत:ला सावरताना दिसते. आपण अनुरागची पहिली पत्नी असून या घरात आपला अधिकार चालेल, हे अनुरागला दाखवून देण्यासाठी ती  त्याच्या घरी येते. आता तिच्या स्वभावाची कणखर बाजू दर्शविण्यासाठी तिच्या रूपातही आमूलाग्र बदल होतो. साध्या आणि आनंदी स्त्रीकडून एका खंबीर आणि निश्चयी महिलेत तिचं रुपांतर होतं. आता ती वेगवेगळ्या साड्या आणि ठसठशीत बिंदी लावताना दिसेल.”

आता ‘स्टार प्लस’वरील ‘कसौटी जिंदगी के’मध्ये आपला हक्क सिध्द करण्यासाठी प्रेरणा आणि कोमोलिका यांच्यातील संघर्ष कसा आकार घेतो, ते पाहणे नक्कीच रंजक ठरणा आहे. तसेच आगामी भागांमध्ये प्रेक्षकांना कथानकाला अनपेक्षित वळणे मिळालेलीही पाहायला मिळेल. 

टॅग्स :कसौटी जिंदगी की 2