Join us

प्रणोती बनणार सूत्रसंचालिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2016 17:26 IST

माही सागर, विकी और वेताल यांसारख्या मालिकांमध्ये झळकलेली अभिनेत्री प्रणोती प्रधान आता एका कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे. कोणतेही जोडपे ...

माही सागर, विकी और वेताल यांसारख्या मालिकांमध्ये झळकलेली अभिनेत्री प्रणोती प्रधान आता एका कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे. कोणतेही जोडपे म्हटले की, त्यांच्याच एकमेकांबाबत प्रेम हे असणारच. पण त्याचसोबत त्यांच्यात होणारी भांडणे, वाद हा त्यांच्या आयुष्याचाच एक भाग असतो. अशाच जोडप्यांना आता एका कार्यक्रमात झळकण्याची संधी मिळणार आहे. अजी सुनते हो... ही नवी मालिका सुरू होणार असून देशातील विविध भागातील लोकांना या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून येण्याची संधी मिळणार आहे. आतापर्यंत छोट्या पडद्यावर दाखवण्यात आलेल्या सगळ्या रिअॅलिटी शोंपेक्षा हा कार्यक्रम खूप वेगळा असणार आहे. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे यात सामान्य लोकांचा सहभाग असणार आहे. जोडप्यांमध्ये असलेले एक सुंदर नाते या कार्यक्रमाद्वारे दाखवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सतिश शर्मा आणि प्रणोती प्रधान या मालिकेच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळणार आहेत. ते या मालिकेत सतिश आणि प्रणोती म्हणून नव्हे तर मिस्टर आणि मिसेस शर्मा म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. देशभरातील जोड्यांना ते या कार्यक्रमात येण्यासाठी आमंत्रण देणार आहेत आणि त्यांच्यासोबत काही खेळ खेळणार आहेत. या खेळांमधून त्यांच्यात असलेल्या प्रेमाची ते परीक्षा घेणार आहेत. या मालिकेची निर्मिती शशी सुमीत प्रोडक्शनने केली आहे. शशी सुमीत यांची पुनर्विवाह ही मालिका प्रचंड गाजली होती. कार्यक्रमात सेलिब्रेटींना न घेता सामान्य लोकांना आपले नाते लोकांसमोर मांडण्याची संधी त्यांनी या कार्यक्रमाद्वारे दिली आहे. पती-पत्नी एकमेकांवर रागावले तर ते एकमेकांची समजूत कशी काढतात हेदेखील येणारी जोडपी लोकांना सांगणार आहेत.