प्रकाश झा यांनी केले अमृता फडणवीस यांचे कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2016 01:32 IST
जय गंगाजल या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रकाश झा यांनी मुख्यमंत्री यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी जय गंगाजल या चित्रपटासाठी गायलेल्या ...
प्रकाश झा यांनी केले अमृता फडणवीस यांचे कौतुक
जय गंगाजल या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रकाश झा यांनी मुख्यमंत्री यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी जय गंगाजल या चित्रपटासाठी गायलेल्या सब धन माटी या भजनाचे कौतुक केले आहे. तसेच झा म्हणाले, हा केवळ योगायोग आहे की, त्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आहेत. त्यापूर्वी त्या एक सर्वोत्तम गायिका आहेत.अमृता फडणवीस यांनी गायलेलं भजन सिनेमात अनेक ठिकाणी बॅकग्राऊंड साँगच्या रुपात देखील वापरण्यात आले आहे. तर अमृता यांनी यापूर्वी मराठी चित्रपटा देखील गाणी गायली आहेत. तर सब धन माटी या भजनाद्वारे अमृता फडणवीस यांची बॉलीवुड धमाकेदार एन्ट्री झाली आहे.