Join us  

प्राजक्ता माळी सिंगापूरच्या बागेत..., आईसोबतचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2024 11:33 AM

प्राजक्ता माळी सध्या सिंगापूरला गेली असून तिचा आईसोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय

प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. प्राजक्ताला आपण आजवर विविध माध्यमांमधून अभिनय करताना पाहिलंय. सिनेमा असो, मालिका असो वा वेबसिरीज.. प्राजक्ता प्रत्येक माध्यमात तिच्या अभिनयाची छाप पाडत आहे. प्राजक्ता माळी सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) च्या माध्यमातून लोकांचं मनोरंजन करतेय. प्राजक्ता सोशल मीडियावर तिच्या आयुष्याबद्दलचे अपडेट्स शेअर करत असते. प्राजक्ता माळी सध्या सिंगापूरला (Singapore) गेली असून तिने तिथला व्हिडीओ शेअर केलाय.

प्राजक्ताने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय.  या व्हिडीओत सिंगापूरच्या Garden by the way and Marina bay sands या ठिकाणी प्राजक्ता आईसोबत भटकंती करताना दिसतेय. हिरव्यागार पाना फुलांनी आच्छादलेलं हे गार्डन असून प्राजक्ता आईसोबत आनंद अनुभवताना दिसतेय. प्राजक्ताने आईचं खास फोटोशूट सुद्धा केलेलं दिसतंय. 

प्राजक्ता सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' टीमसोबत सिंगापूरला गेली आहे. हास्यजत्राचा सिंगापूरमध्ये विशेष शो आयोजित केला जातोय. यामुळे शिवाली परब, पृथ्वीक प्रताप, ओंकार राऊत, चेतना भट, समीर चौगुले, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव असे हास्यजत्रातले सर्वच कलाकार सिंगापूरला गेले आहेत. यावेळी सर्वांसोबत प्राजक्ता माळी सुद्धा आहे. प्राजक्ता सिंगापूरला आईलाही सोबत घेऊन गेली असून दोघी  माय-लेकींचे फोटो, व्हिडीओ सध्या चांगलेच चर्चेत आहेत.

टॅग्स :प्राजक्ता माळीसिंगापूरमहाराष्ट्राची हास्य जत्रा