Join us

pool romance: गौरव आणि त्याच्या पत्नीचा रोमँटिक हॉलीडे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2017 11:17 IST

सोशल मीडियावर दोघांनी आपल्या हॉलीडेचे फोटो शेअर केले आहेत. गौरव आणि आकांक्षा स्विमिंग पूलमध्ये रोमँटिक पोज देत असल्याचा फोटो रसिकांच्या पसंतीस पात्र ठरतोय.

छोट्या पडद्यावरील प्रेम या पहेलीः चंद्रकांता या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता गौरव खन्ना आणि त्याची पत्नी आकांक्षा चमोला यांच्या रोमँटिक विकेंडचे फोटो समोर आले आहेत. नेहमीचं शुटिंगचं बिझी शेड्युलपासून वेळ काढत गौरव पत्नीसह हॉलीडेचा आनंद घेत असल्याचं या फोटोत पाहायला मिळतंय. सोशल मीडियावर दोघांनी आपल्या हॉलीडेचे फोटो शेअर केले आहेत. गौरव आणि आकांक्षा स्विमिंग पूलमध्ये रोमँटिक पोज देत असल्याचा फोटो रसिकांच्या पसंतीस पात्र ठरतोय. गौरव आणि आकांक्षा यांचं सहा महिन्याआधी 24 नोव्हेंबर 2016 रोजी लग्न झालंय. गौरव छोट्या पडद्यावरील विविध मालिकांमधील भूमिकांच्या माध्यमातून घराघरात पोहचला आहे. त्यानं आपल्या टीव्हीवरील अभिनय कारकिर्दीची सुरुवात 2006 साली भाभी या मालिकेपासून केली होती. त्यानंतर त्याने कुमकुम, जमेगी जोडी डॉट कॉम, मेरी डोली तेरे अंगना, जीवनसाथी, ये प्यार ना होगा कम, दिल से दिया वचन, ससुराल सिमर का अशा विविध मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे.सध्या तो प्रेम या पहेलीः चंद्रकांता या मालिकेत भूमिका साकारत आहे.मात्र आता गौरवच्या अभिनयासोबतच त्याच्या रोमँटिक विकेंडची जोरदार चर्चा रंगली आहे.  गौरवचे हे रिअल लाईफ फोटो जितके त्याच्या चाहत्याच्या पसंती उतरत आहेत. तितकेच त्याचे ऑनस्क्रीन कामही रसिकांना भावतंय. गौरव खन्ना राजपुत्र विरेंद्र सिंग तर क्रितिका कामरा 'चंद्रकांता' ही भूमिका साकारत आहे. मालिकेतील क्रितिका आणि गौरवची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. या दोघांच्या केमिस्ट्रीबद्दल गौरव सांगतो, "क्रितिका ही खूप चांगली अभिनेत्री असल्यामुळेच आमच्या दोघांची केमिस्ट्री खूप चांगली जुळून आली आहे. सहकलाकार म्हणून तुम्ही एकमेकांना चांगल्याप्रकारे समजून घेतले तर तुमचे परफॉर्मन्स अधिक चांगले होतात असे मला वाटते. क्रितिकामुळे माझी भूमिका अधिक खुलून येत आहे असे मला वाटते.तिच्यामुळेच मला काम करणे अधिक सोपे जात आहे. खऱ्या आयुष्यातही आम्ही दोघांची खूप चांगली मैत्री आहे आणि त्यामुळे हीच केमिस्ट्री प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळत आहे.