पूजा सावंत पहिल्यांदा हॉरर चित्रपटात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2016 22:13 IST
दगडी चाळ, पोस्टर बॉइज या चित्रपटातून प्रेक्षकांची मन जिंकून घेणारी सुंदर अभिनेत्री पूजा सावंत पहिल्यांदा लपाछपी या मराठी हॉरर ...
पूजा सावंत पहिल्यांदा हॉरर चित्रपटात
दगडी चाळ, पोस्टर बॉइज या चित्रपटातून प्रेक्षकांची मन जिंकून घेणारी सुंदर अभिनेत्री पूजा सावंत पहिल्यांदा लपाछपी या मराठी हॉरर चित्रपटात झळकणार आहे. प्रेम,नाती, कॉलेज मस्ती या नेहमीच्या विषयापेक्षा ही कहानी वेगळी असणार आहे. लपाछपी या चित्रपटाच्या माध्यमातून मराठीमध्ये हॉरर हा चित्रपट देखील पहिल्यांदाच पाहायला मिळेल. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल फुरिया यांनी केले असून विशाल कपूर यांनी पटकथा लिहीली आहे. तर रंजन पटनाईक यांनी संगीत दिले आहे. आणि जितेंद्र पाटील यांची निमिर्ती आहे. तसेच या चित्रपटात उषा नाईक, विक्रम गायकवाड या कलाकारांचा देखील समावेश आहे. पूजाचा हा पहिलाच हॉरर, सस्पेन्स व थ्रिलर चित्रपट असून ती यामध्ये एका वेगळया व हटके लूकमध्ये दिसणार आहे.