मराठी कलाविश्वातील 'पॉवर कपल' म्हणून ओळखले जाणारे पूजा बिरारी आणि सोहम बांदेकर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. निमित्त आहे सोहम बांदेकर याच्या वाढदिवसाचं. काल ७ मे रोजी सोहमने आपला वाढदिवस साजरा केला. लग्नानंतर सोहमचा हा पहिलाच वाढदिवस असल्याने पूजाने आपल्या लाडक्या पतीसाठी एक अतिशय गोड आणि रोमँटिक पोस्ट शेअर केली आहे.
पूजाने सोहमसोबतचे काही सुंदर फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पूजा लिहिते, "वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा सोहम! तू एकटाच असा आहेस जो मला एका क्षणात त्रासही देऊ शकतो, हसवू शकतो आणि शांतही करू शकतो. खूप विनोदी, हुशार आणि खरंच भन्नाट टॅलेंटेड आहेस. तू माझ्या आयुष्यातील 'Once In A Lifetime Human' आहेस. तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. आपल्या सगळ्या ड्रामॅटिक दिवसांनंतर अजूनही तू माझा सर्वोत्तम निर्णय आहेस"
पुढे तिनं लिहलं, "तुझ्या त्या ओव्हरस्मार्टपणात आणि वेड्यासारख्या परफेक्ट मिठीत, मी पूर्णपणे हरवून गेले. तूच माझी शांतता, तूच माझा गोंधळ आणि फोनकडे बघून वेड्यासारखं हसायचं कारणही. त्या माणसाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, ज्याच्यावर मी कायम प्रेम करत राहणार, मनापासून, मोठ्याने आणि कोणत्याही रिफंडशिवाय. इतकी कौतुकाची फी दिल्यानंतरही… माझ्या रोजच्या eye-roll workout साठी अजूनही ६० टक्के जबाबदार तूच आहेस. तरीही तुझ्यावर मी आयुष्यभर असंच प्रेम करत राहीन", असे म्हणत पूजानं #mypaglu #pookie या हॅशटॅगही दिले. पूजाच्या या पोस्टवर सोहमनेही "प्रत्येक गोष्टीबद्दल धन्यवाद" अशी कमेंट केली.
कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव
पूजाच्या या पोस्टवर केवळ चाहतेच नाही, तर मराठी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गजांनी कमेंट्स केल्या आहेत. नीना कुलकर्णी, विशाल निकम, सानिका बनारसवाले यांसारख्या कलाकारांनी सोहमला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
लोणावळ्यात रंगला होता शाही विवाहसोहळा
आदेश आणि सुप्रिया बांदेकर यांचा एकुलता एक लेक सोहम आणि पूजा बिरारी यांचा विवाह २ डिसेंबर २०२५ रोजी लोणावळ्यात अतिशय थाटामाटात पार पडला होता. त्यानंतर मुंबईत झालेल्या रिसेप्शन पार्टीलाही मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक ताऱ्यांनी हजेरी लावली होती.
सोहम बांदेकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो सध्या एक यशस्वी निर्माता म्हणून ओळखला जातो. 'ठरलं तर मग' आणि 'घरोघरी मातीच्या चुली' यांसारख्या सुपरहिट मालिकांनंतर आता तो 'पाठराखीण' ही नवीन मालिका घेऊन येत आहे. त्याच्या प्रॉडक्शनची 'ठरलं तर मग' ही मालिका गेल्या साडेतीन वर्षांपासून टीआरपीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. तर पूजा बिरारी ही सध्या स्टार प्रवाहवरील 'येड लागलं प्रेमाचं’'या मालिकेत 'मंजिरी' ही मुख्य भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकत आहे.
Web Summary : Pooja Birari's heartfelt birthday message to Soham Bandekar is trending. She shared loving photos and expressed deep affection, calling him her 'Once In A Lifetime Human'. The couple, known as a 'power couple', celebrated his birthday with wishes from celebrities like Neena Kulkarni.
Web Summary : पूजा बिरारी का सोहम बांदेकर के लिए जन्मदिन का हार्दिक संदेश ट्रेंड कर रहा है। उन्होंने प्यारी तस्वीरें साझा कीं और गहरा स्नेह व्यक्त करते हुए उन्हें 'वन्स इन ए लाइफटाइम ह्यूमन' कहा। 'पॉवर कपल' के रूप में जाने जाने वाले इस जोड़े ने नीना कुलकर्णी जैसी हस्तियों की शुभकामनाओं के साथ उनका जन्मदिन मनाया।