Join us

​पूजा बॅनर्जी कुणाल वर्मासोबत करणार साखरपुडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2017 16:25 IST

पूजा बॅनर्जीने कहानी हमारे महाभारत की या मालिकेपासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. पण देवो के देव महादेव या मालिकेत ...

पूजा बॅनर्जीने कहानी हमारे महाभारत की या मालिकेपासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. पण देवो के देव महादेव या मालिकेत तिने साकारलेल्या पार्वती या व्यक्तिरेखेमुळे ती खऱ्या अर्थाने नावारूपाला आली. पूजाच्या फॅन्ससाठी एक खूपच चांगली बातमी आहे. पूजा लवकरच तिच्या प्रियकरासोबत साखरपुडा करणार असल्याचे म्हटले जात आहे.पूजा कुणाल वर्मासोबत गेल्या अनेक महिन्यांपासून नात्यात आहे. कुणाल हा देखील अभिनेता असून त्याने तुज संग प्रीत लगाई सजना या बालाजी टेलिफ्लिम्सच्या मालिकेत काम केले होते. पूजा आणि कुणाल यांची ओळख देखील याच मालिकेच्या चित्रीकऱणाच्या दरम्यान झाली होती. पूजा आणि कुणाल नात्यात असल्याच्या बातम्या गेल्या कित्येक दिवसांपासून येत होत्या. पण त्यांनी यावर काहीही भाष्य करणे टाळले होते. दरम्यानच्या काळात त्यांचे ब्रेकअप झाले असल्याचे देखील म्हटले जात होते. पण त्यांच्या फॅन्ससाठी एक चांगली बातमी आहे. ते दोघे आता 16 ऑगस्टला साखरपुडा करणार आहेत. पूजाने देखील या बातमीला दुजोरा दिला आहे. पूजा सांगते, मी आणि कुणाल गेल्या काही महिन्यांपासून नात्यात आहोत. आता आम्ही 16 ऑगस्टला साखरपुडा करण्याचे ठरवले आहे. आम्ही मुंबईत आमच्या जवळच्या नातेवाईकांच्या आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत साखरपुडा करणार आहोत. मी सध्या माझ्या साखरपुड्याच्या तयारीत व्यग्र आहे. लवकरच माझ्या दोन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून त्याचे चित्रीकरण लवकरच सुरू होणार आहे. त्याआधी मी संपूर्ण तयारी करून घेणार आहे. मी माझ्या या दोन नव्या मालिकांसाठी आणि साखरपुड्यासाठी खूप उत्सुक आहे. Also Read : पूजा बॅनर्जी बनली आशिष चौधरीची पत्नी