विभूती बनला पोलीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2016 11:08 IST
भाभीजी घर पर है या मालिकेतील विभूती नेहमीच आपल्याला घरातील सगळी कामे करताना पाहायला मिळतो. पण आता हा विभूती ...
विभूती बनला पोलीस
भाभीजी घर पर है या मालिकेतील विभूती नेहमीच आपल्याला घरातील सगळी कामे करताना पाहायला मिळतो. पण आता हा विभूती घरातील कामे न करता नोकरी करणार आहे. पोलिस खात्यात तो रुजू होणार असून दबंग पोलिस म्हणून तो प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पण विभूतीला नोकरी मिळाल्याने तिवारीला चांगलाच धक्का बसणार आहे तर या उलट अनिता त्याची प्रशंसा करणार आहे. अभिनेता आसिफ शेखने याआधीही मालिकांमध्ये पोलिसाची भूमिका साकारली आहे. पुन्हा एकदा हीच भूमिका साकारायला मिळत असल्याने तो सध्या खूप खुश असल्याचे तो सांगतो.