Join us  

पीएम मोदींचा संदेश अन् 'आत्मनिर्भर' झाली कविता कौशिक, केले असे आसन की चाहते म्हणाले 'Spider Woman'!  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 1:37 PM

कविता कौशिकची ही योग मुद्रा पाहून चाहते इम्प्रेस झाले आहेत.

अभिनेत्री कविता कौशिक वादग्रस्त विधान व बोल्ड फोटोंमुळे चर्चेत येत असते. मात्र आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्याला कारणही तसंच आहे. तिने पंतप्रधान नेरंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भरतेच्या घोषणेने प्रेरीत होऊन एक योग मुद्रा केली आहे. ही योग मुद्रा पाहून चाहतेही इम्प्रेस झाले आहेत. तिचा हा योग मुद्राचा फोटो व्हायरल होत आहे.कविताने जी योग मुद्रा केली आहे तो फोटो एका चाहत्याने ट्विटरवरून शेअर केला आहे. यात ती एक कठिण  योग मुद्रा करताना दिसत आहे. अनेकांनी तिला यावरून प्रश्न केला की, हे नेमके कोणते आसन आहे. युजरचे हे ट्विट रिट्विट करत कविता म्हणाली याला आपण आत्मनिर्भर आसन असे म्हणूयात. 

पीएम नरेंद्र मोदींनी मंगळवारी देशाला संबोधित केले. आपल्या भाषणात त्यांनी आत्मनिर्भर या शब्दाचा वापर केला होता. 

कविताचा हा फोटो समोर आल्यानंतर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहे. अनेकांनी या अवघड आसनासाठी तिचे कौतुक केले केले आहे. एकाने तर एखाद्या पेंटींगप्रमाणे वाटत असल्याची कमेंट केली आहे. एका युजरने कमेंट केली की, काश मी तुमचा विद्यार्थी असलो असतो. काहींनी असाही सवाल केला की, ही स्पायडर वुमन कोण आहे. 

टॅग्स :कविता कौशिकनरेंद्र मोदीयोगासने प्रकार व फायदे