Join us

खुल्लमखुल्ला मलेशियात अनुराग शर्माने पत्नीसोबत केले लिपलॉक, हनीमूनचे फोटो होतायेत व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 12:23 IST

पवित्र रिश्ता फेम अभिनेता अनुराग शर्मा त्याची गर्लफ्रेंड नंदिनी गुप्तासोबत ३१ जानेवारीला लग्नबेडीत अडकला.

पवित्र रिश्ता फेम अभिनेता अनुराग शर्मा त्याची गर्लफ्रेंड नंदिनी गुप्तासोबत ३१ जानेवारीला लग्नबेडीत अडकला. सध्या ते दोघे मलेशियात हनीमूनसाठी गेले आहेत आणि तिथे एन्जॉय करतानाचे फोटो ते सोशल मीडियावर शेअर करत आहेत. ते दोघे रोमँटिक अंदाजात पहायला मिळत आहेत. यादरम्यान त्यांचा लिपलॉक करतानाचा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. 

अनुराग शर्मा व नंदिनी गुप्ता मलेशियामध्ये एकमेकांसोबत क्वॉलिटी टाईम व्यतित करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर त्या दोघांचा रोमँटिक अंदाज पहायला मिळतो आहे. तसेच यावेळी त्या दोघांचा लिपलॉक करतानाचा फोटोही समोर आला आहे. 

अनुराग शर्मा व नंदिनी गुप्ता यांचा लग्नसोहळा दिल्लीत पार पडला आहे. त्यांनी प्री वेडिंग फोटोशूटही केले. 

अनुराग व नंदिनी बऱ्याच कालावधीपासून एकमेकांना डेट करत आहेत. ते दोघे एकमेकांना जवळपास पाच वर्षांपासून ओळखतात. त्यांच्या नात्याची सुरूवात मैत्रीने झाली होती.

अनुरागने त्याच्या करियरची सुरूवात २००९ साली एकता कपूरची मालिका 'पवित्र रिश्ता'मधून केली होती. या मालिकेत त्याने सतीश देशपांडेची भूमिका साकारली होती.

त्यानंतर त्याने 'तेरे लिए', 'ब्याह हमारी बहू का', 'अदालत', 'जोधा अकबर', 'ये है आशिकी', 'कुमकुम भाग्य', 'अजीब दास्तां है ये', 'इतना करो न मुझे प्यार', 'कवच काली शक्तियों से' व 'उडान' या मालिकेत काम केले आहे.

टॅग्स :टिव्ही कलाकारमलेशिया