Join us

36 दिवसांपासून कोरोनाशी लढतोय अभिनेता अनिरूद्ध दवे, शेअर केली भावुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 17:01 IST

Aniruddh Dave health update : ‘पटियाला वेब्स’ फेम अभिनेता अनिरूद्ध दवे गेल्या 36 दिवसांपासून कोरोनाशी लढतोय. अद्यापही तो रूग्णालयात आहे.

ठळक मुद्देअनिरुद्ध टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने शक्ति अस्तित्व के एहसास की, पटियाला बेब्ससोबत बऱ्याच  मालिकेत काम केले आहे.

‘पटियाला वेब्स’ (Patiala Babes) फेम अभिनेता अनिरूद्ध दवे (Aniruddh Dave) गेल्या 36 दिवसांपासून कोरोनाशी लढतोय. अद्यापही तो रूग्णालयात आहे. अर्थात आता त्याची प्रकृती वेगाने सुधारतेय.  त्याला आयसीयूतून बाहेर शिफ्ट करण्यात आले आहे. (Aniruddh Dave health update)अनिरूद्धने स्वत: ट्विटरवर आपल्या तब्येतीबद्दल माहिती दिली.

एक फोटो शेअर करत त्याने लिहिले, ‘36 व्या दिवशीही झुंज कायम आहे. आताही  ऑक्सिजन सपोर्टवर आहे. पण फुफ्फुसांमध्ये रिकव्हरी आहे. डॉ. गोयंका यांनी जास्त बोलण्यास मनाई केली आहे. मात्र रिप्लाय देण्यास, प्रियजनांनाच्या संपर्कात राहण्याची परवानगी आहे. चित्रपट आणि शो पाहण्याचीही परवानगी दिली गेली आहे. नवे आयुष्य मिळालेय. जणू माझा नवा जन्म झाला, असे वाटतंय. आता मी वॉक करणार. सेल्फी तो बनती है... तुम्हा सर्वांचे आभार...’अनिरूद्धच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. अनेकांनी तो लवकर बरा व्हावा, यासाठी प्रार्थना केली आहे.

अनिरूद्ध दवे याला गेल्या एप्रिल महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. अनिरूद्ध भोपाळमध्ये एका वेबसीरिजच्या शूटींगसाठी गेला होता. याचदरम्यान त्याची प्रकृती बिघडली होती आणि यानंतर आणखी बिघडत गेली. ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले होते. फुफ्फुसांमध्ये संसर्ग झाला होता. गंभीर अवस्थेत त्याला आयसीयूमध्ये भरती करण्यात आले होते. तेव्हापासून तो रूग्णालयात आहे. गेल्या महिन्यात अनिरूद्धला आयसीयूबाहेर शिफ्ट करण्यात आले. पण अद्यापही तो पूर्णपणे बरा झालेला नाही.अनिरुद्ध टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने शक्ति अस्तित्व के एहसास की, पटियाला बेब्ससोबत बऱ्याच  मालिकेत काम केले आहे. तो अक्षय कुमारचा चित्रपट बेलबॉटममध्येही दिसणार आहे. 

टॅग्स :पटियाला बेब्सटेलिव्हिजन