Join us

पार्थ समथानने केला आपल्या चाहत्यांवर प्रेमाचा वर्षाव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2019 20:30 IST

‘कसौटी झिंदगी के’ मालिकेत आपल्या अनुराग बसूच्या व्यक्तिरेखेद्वारे पार्थ समथान हा असंख्य तरुणींच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.

स्टार प्लसवरील ‘कसौटी झिंदगी के’ मालिकेत आपल्या अनुराग बसूच्या व्यक्तिरेखेद्वारे पार्थ समथान हा असंख्य तरुणींच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेच्या प्रसारणाला प्रारंभ झाल्यापासूनच पार्थला अनुरागच्याव्यक्तिचित्रणाबद्दल त्याचे चाहते आणि प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम आणि प्रतिसाद लाभत आहे. आता आपल्या या चाहत्यांच्या भरभरून लाभलेल्या प्रेमाची काहीशी परफेड करण्यासाठी पार्थने व्हॅलेंटाईनदिनी त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करण्याचेठरविले होते. त्याला प्रत्यक्ष पाहावे आणि त्याच्याबरोबर काही वेळ व्यतीत करावा, ही चाहत्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने वर्षातील सर्वात रोमँटिक दिवसाची निवड केली होती.आपल्या निष्ठावान चाहत्यांना खुश करण्यासाठी त्याने एका धमाल मस्तीपूर्ण व्हॅलेंटाईनदिनाची आखणी केली. त्याच्या 50 कट्टर चाहत्यांना या मालिकेच्या सेटवर पाचारण करण्यात आले. तिथे त्यांनी पार्थवर गुलाबपुष्पे, चॉकोलेट, भेटवस्तूआणि प्रेमपत्रे यांचा वर्षाव केला. त्याची परतफेड म्हणून पार्थनेही त्यांना लाल गुलाब, कपकेक भेट दिले आणि त्याने काही जणांबरोबर ‘कसौटी झिंदगी के’च्या शीर्षकगीतावर नाचही केला. पार्थला आपल्या चाहत्यांबरोबर वेळ व्यतीतकरताना मानसिक समाधान लाभत होते आणि त्याच्या चाहत्यांनाही त्याचा सहवास तर मिळालाच, शिवाय त्याच्याबरोबर त्यांना हास्यविनोद करता आले आणि अनेकांनी त्याच्याबरोबर सेल्फी काढल्या.

या घटनेबद्दल आनंद व्यक्त करताना पार्थ म्हणाला, “माझ्या चाहत्यांकडून माझ्यावर होत असलेल्या सततच्या प्रेमाच्या वर्षावामुळे मी अगदी भारावून जातो आणि म्हणून त्यांच्या या प्रेमाची छोटीशी परतफेड करून त्यांचे आभार मानण्याचीएक संधी मला मिळाली, त्याचा मला आनंद झाला. व्हॅलेंटाईनदिन म्हणजे प्रेमाचा उत्सव असून माझ्या चाहत्यांची भेट घेऊन त्यांच्याबरोबर मजेत वेळ व्यतीत करण्यासाठी हा अगदी सुयोग्य दिवस होता. पण आपापली महत्त्वाची कामेबाजूला ठेवून माझी भेट घेण्यासाठी माझे चाहते इतक्या मोठ्या संख्येने वेळ काढतील, अशी मी कल्पनाच केलेली नव्हती. माझ्या चाहत्यांचं प्रेम हीच माझ्यासाठी सर्वात अनमोल भेट असून त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याबरोबर धमालमस्तीकरणे हा एक अपूर्व अनुभव होता. त्यांची भेट झाल्यावर मला खूप आनंद झाला आणि त्यांच्या चेहऱ्यावर मी आनंद आणू शकलो, याबद्दल मी स्वत:ला सुदैवी समजतो.”पार्थ समथानच्या कृती त्याच्या सज्जन व्यक्तिमत्त्वाचा पुरावा असून त्यामुळेच तो अनेकांना आकर्षित करतो. तरुण मुली या त्याच्यावर बेहद्द खुश असून त्याची भेट घडणे हे त्यांना आपले एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटते. पार्थने यामालिकेतील अनुराग बसूच्या व्यक्तिरेखेत प्राण फुंकले असून प्रत्येक तरूण मुलगी त्याच्यावर मुग्ध झाली आहे.

टॅग्स :कसौटी जिंदगी की 2स्टार प्लस