टप्पू सेनाची गोव्यामध्ये धमाल मस्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2017 17:28 IST
टप्पू सेनेला वेद लागले होते गोव्याला जायचे. यासाठी टप्पू सेना परवानगी मागण्यास आपआपल्या आई-वडिलांकडे जातात.भिडेला सोनूला टपू बरोबर एकटीला ...
टप्पू सेनाची गोव्यामध्ये धमाल मस्ती
टप्पू सेनेला वेद लागले होते गोव्याला जायचे. यासाठी टप्पू सेना परवानगी मागण्यास आपआपल्या आई-वडिलांकडे जातात.भिडेला सोनूला टपू बरोबर एकटीला गोव्याला पाठवायचे नसते म्हणून मी वेळा विचार केल्यानंतर भिडे एक शक्कल लढवतो. भिडे स्वत: माधवी आणि सोनूला घेऊन टप्पूसेनाबरोबर गोव्याला जातो. भिडे आणि माधवी गोव्याला जातेय हे ऐकून सोढी आणि रोशन ही त्यांच्या या प्लॉनमध्ये सामील होतात. तर तिकडे गोव्याला जाण्याची मुलांची तयारी बघून बापू जी पण टप्पूसेना बरोबर गोव्याला जायला तयार होतात. गोकुळधाममधली ही गँग गोव्यामध्ये दाखल झाल्यानंतर एकच जल्लोष करते. गोव्यात जाऊऩ या सगळ्यांनी वाटर राईड एन्जॉय केली, गोव्यातले चर्च त्यांनी बघितले. सगळी बीचेस आणि देवळांमध्ये जाऊनही त्यांनी दर्शन घेतले आहे. माधवी म्हणाली, ''आम्ही गोव्यात शूटिंगदरम्यान खूप मज्जा मस्ती केली. गोव्यात आम्ही खूप फिरलो तिकडच्या सुंदर आठवणी घेऊन आम्ही परत आलो आहोत.गोव्यात शूटिंग करताना आम्हाला असे वाटलेच नाही की आम्ही इथे कामासाठी आलो आहोत असे वाटत होते की आम्ही कुटुंबाबरोबर सुट्टी एन्जॉय करायला आले आहोत.'' मज्जा आणि मस्ती याच दुसरं नाव गोवा आहे. गोवा ही सुरक्षित राज्य आहे. गोकुळधाम मधल्या इतक्या मेंबर्सना घेऊन ज्यात लहान मुलांचा ही समावेश होता त्यामुळे आम्हाला एक सुरक्षित शहर दाखवायचे होते. याशिवाय गोव्यात टाईमपास आणि इतर ही करण्यासारख्या खूप एक्टिव्हिटी आहेत. त्यामुळे आम्ही गोव्याला जाण्याचा निर्णय घेतल्याचे निर्माता आणि क्रिएटीव्ह असित मोदी यांनी सांगितले.