Join us  

किचन कल्लाकारच्या मंचावर परीने करुन दाखवली या कलाकारांची नक्कल, संकर्षणची झाली बोलती बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2022 11:30 AM

छोट्या पडद्यावर 'मस्त मजेदार किचन कल्लाकार' ( Kitchen Kallakar) हा नवा कुकरी शो सुरु झाला आहे.

काही दिवसांपूर्वीच छोट्या पडद्यावर 'मस्त मजेदार किचन कल्लाकार' ( Kitchen Kallakar) हा नवा कुकरी शो सुरु झाला आहे. या कार्यक्रमात अभिनेता प्रशांत दामले (Prashant Damle)परिक्षकाच्या भूमिकेत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर अभिनेता संकर्षण क-हाडे सूत्रसंचालकाची भूमिका बजावत आहे. किचन आणि कलाकार हे समीकरण जुळलेलं नसताना पाककलेच्या कसोटीला उतरलेल्या कलाकारांची उडणारी तारांबळ बघताना प्रेक्षकांना खूप मजा येतेय. प्रेक्षक आपल्या लाडक्या कलाकारांना या कार्यक्रमात किचनमध्ये धावपळ करताना पाहतात पण या आठवड्यात त्यांचे लाडके बालकलाकार महाराजांना त्याच्या इवल्याश्या हाताने पदार्थ करून देणार आहेत.

आगामी भागात प्रेक्षकांची लाडकी परी म्हणजे मायरा वैकुळ येणार आहे. यावेळी परी किचन कल्लाकारच्या मंचावर 'माझी तुझी रेशमगाठ'मालिकेतील कलाकारांच्या नक्कल करताना दिसणार आहे. परीसोबत सारेगमपची फायनलिस्ट स्वरा जोशी आणि खारी बिस्कीट मधली खारी म्हणजे वेदश्री खाडिलकर देखील कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. महाराज नेहमी कलाकारांना काहीतरी कठीण पदार्थ करायला लावतात आता या बच्चेकंपनीला महाराज कोणता पदार्थ करायला सांगणार हे पाहणं औस्त्युक्याचं ठरेल. आता या लहानग्यांचे लहान हात किचनमध्ये काय मोठी कमाल करून दाखवणार हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.

टॅग्स :झी मराठीटिव्ही कलाकारप्रशांत दामले